किडनीचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे
किडनी शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. शरीरात साचून राहिलेले घटक बाहेर बाहेर काढून टाकण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी किडनीचे कार्य निरोगी असणे आवश्यक आहे. दैनंदिन आहारात होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पचनसंबंधित समस्या, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो.किडनीसंबंधित गंभीर आजार झाल्यानंतर सुरवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. किडनीसंबंधित आजार झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणत्याच वेदना होत नाहीत.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात घामामुळे शरीराची आग होते? मग शांत आणि आरामदायी झोपेसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
शरीरात कॅन्सरच्या गाठी झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे नियमित निरोगी जीवन जगणे आवश्यक आहे. किडनीचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होण्यास सुरुवात झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला किडनीचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
किडनीचा कॅन्सर झाल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारे लक्षण म्हणजे लघवीतून रक्त येणे. याला हेमॅट्यूरिया असे म्हणतात. कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे दिसतात. मात्र हीच लक्षणे बऱ्याचदा लक्षात येत नाहीत. त्यामुळे लघवीचा रंग लाल किंवा गुलाबीसर दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
किडनीसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर पाठीमध्ये वेदना होऊ लागतात. किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात आणि ट्युमर तयार होऊ लागतो. ट्युमरची गाठ तयार झाल्यानंतर कंबरेत किंवा पाठीमध्ये वेदना होतात. मात्र याच गाठी वाढल्यामुळे कंबरदुखी आणि पाठदुखी मोठ्या प्रमाणात वाढू लागते. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन कमी होत असल्यास डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. किडनी कॅन्सरच्या गंभीर लक्षणांपैकी एक म्हणजे अचानक वजन कमी होत जाणे. शरीरात वाढलेल्या कॅन्सरच्या पेशी निरोगी पेशींवर हल्ला करतात, ज्यामुळे शरीराचे कार्य बिघडते. यामुळे शरीराची पोषण शक्ती पूर्णपणे कमी होऊन जाते. वजन झपाट्याने कमी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.