Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tomato Soup Recipe: कॉर्नफ्लोअरचा अजिबात वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये बनवा गरमागरम टोमॅटो सूप, शरीर राहील फ्रेश

Tomato Soup Recipe: थंडीच्या दिवसांमध्ये विकतचे तेलकट पदार्थ खाण्याऐवजी गरमागरम टोमॅटो सूप प्यावे. यामुळे शरीराला सुद्धा फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया टोमॅटो सूप बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 15, 2026 | 10:43 AM
Tomato Soup Recipe: कॉर्नफ्लोअरचा अजिबात वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये बनवा गरमागरम टोमॅटो सूप, शरीर राहील फ्रेश

Tomato Soup Recipe: कॉर्नफ्लोअरचा अजिबात वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये बनवा गरमागरम टोमॅटो सूप, शरीर राहील फ्रेश

Follow Us
Follow Us:

Tomato Soup Recipe: राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. कारण या दिवसांमध्ये थंड वातावरणामुळे आजार वाढतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि शरीरात थकवा जाणवू लागतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आहारात वेगवेगळ्या उष्ण आणि शरीरात ऊबदारपणा टिकवून ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. थंड वातावरणात सगळ्यांचं काहींना काही गरमागरम खाण्याची इच्छा होते, अशावेळी टोमॅटो सूप किंवा इतर वेगवेगळ्या भाज्यांचे सूप बनवले जातात. पण हॉटेलमध्ये सूप बनवताना त्यात कॉर्नफ्लोअरचा वापर केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला कॉर्नफ्लोअरचा अजिबात वापर न करता क्रिमी टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सूप घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Soup Recipe: हिवाळ्यात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरी बनवा गरमागरम हिरव्या मुगाचे सूप, शरीराला मिळेल भरपूर ऊर्जा

साहित्य:

  • टोमॅटो
  • कांदा
  • गाजर
  • बीट
  • काळीमिरी
  • मीठ
  • तूप
  • आलं
  • लसूण
  • कोथिंबीर काड्या
  • ब्रेड स्लाईस
Rava Chilla: नाश्त्यात काहीतरी हेल्दी अन् टेस्टी हवंय? फक्त १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत रव्याचा चिला; रेसिपी नोट करा

कृती:

  • टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात बटर आणि तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण, आले आणि कोथिंबिरीच्या काड्या घालून मंद आचेवर परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात कांदा आणि टोमॅटो घालून मिक्स करा. वरून चवीनुसार मीठ, काश्मिरी लाल तिखट आणि धने-जिरे पावडर, गाजर, बीटचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कांदा टोमॅटो शिजून मऊ झाल्यानंतर त्यात तमालपत्र, काळी मिरी आणि मोठ्या वेलचीचे दाणे घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात दोन ते तीन कप पाणी घाला आणि कुकरच्या ५ ते ६ शिट्ट्या काढा.
  • ब्रेड स्लाइसचे मध्यम आकारात तुकडे करून पॅनमध्ये तेल आणि बटर गरम करून त्यात भाजून घ्या. दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून झाल्यानंतर गॅस बंद करा आणि ब्रेड काढून घ्या.
  • शिजवून घेतलेल्या मिश्रणातील खडा मसाला काढून सर्व साहित्य मॅशरच्या मदतीने बारीक करा किंवा मिक्सरच्या भांड्यात टाकून पेस्ट बनवून घ्या.
  • आवश्यकता वाटल्यास सूपमध्ये पाणी आणि चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये गरमागरम टोमॅटोचे सूप. भाजलेल्या ब्रेडच्या स्लाइससोबत टोमॅटो सूप अतिशय सुंदर लागेल.

Web Title: Tomato soup recipe how to make tomato soup at home winter recipe sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Soup Recipes
  • tomato

संबंधित बातम्या

Soup Recipe: हिवाळ्यात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरी बनवा गरमागरम हिरव्या मुगाचे सूप, शरीराला मिळेल भरपूर ऊर्जा
1

Soup Recipe: हिवाळ्यात वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरी बनवा गरमागरम हिरव्या मुगाचे सूप, शरीराला मिळेल भरपूर ऊर्जा

Rava Chilla: नाश्त्यात काहीतरी हेल्दी अन् टेस्टी हवंय? फक्त १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत रव्याचा चिला; रेसिपी नोट करा
2

Rava Chilla: नाश्त्यात काहीतरी हेल्दी अन् टेस्टी हवंय? फक्त १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत रव्याचा चिला; रेसिपी नोट करा

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
3

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
4

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.