उन्हाळा सुरु झाला की सर्वांना कधी एकदा गोड रसाळ आंबा खायला मिळतोय याची आतुरतेने लोक वाट पाहत असतात. आंब्यापासून अनेक पदार्थ देखील बनवले जातात, जे इतके स्वादिष्ट असतात जे खाल्ल्यानंतर लोक स्वत:चे बोटे चाटतात. त्यातच आमर हा आपल्या सगळ्यांचाच अगदी आवडीचा पदार्थ आहे. आमरस खाल्ल्याशिवाय आपल्यालाही चैन पडत नाही. आता या आमरसला जगात अव्वल स्थान प्राप्त झाले.
टेस्ट अॅटलासच्या फूड गाईडतर्फे दिलेल्या गेलेल्या क्रमांकानुसार आंब्यापासून तयार केल्या जाणाऱ्या 10 पदार्थांमध्ये आमरस नंबर वन पदार्थ ठरला आहे. या यादीत त्याला पहिला क्रमांक मिळाला आहे. यात आंब्यापासून तयार केलेल्या मराठमोळ्या चटणीचाही समावेश आहे. आमरस हा पदार्थ महाराष्ट्रापासून संपूर्ण देशात तसेच जगात प्रसिद्ध आहे. जिथे जिथे भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत तिथे आमरस अगदी चवीने खाल्ला जातो. त्यातून आता हा आमरस जगात अव्वल ठरला आहे.
आमरस कसा बनवायचा? (Aamras Recipe, How to make Aamras Puri)
आमरस बनवण्यासाठी आधी आंबे स्वच्छ पाण्याने चांगले धुवा. नंतर स्वच्छ किचन टॉवेलने नीट पुसून वाळवा. आता आंब्याचे साल काढून घ्या आणि आंब्याचे तुकडे करा. आता कापलेले आंबे ब्लेंडरमध्ये टाका. जर आंबा थोडा आंबट असेल तर त्यात थोडी साखर किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही गोड पदार्थ घाला. तु्म्हाला हवे असेल तर तुम्ही थोडेसे गुळही वापरू शकता. आता त्याचा मऊ गर होईपर्यंत ब्लेंड करा. आता हा आंब्याचा पल्प एका बाउलमध्ये काढा. आता त्यात वेलची पावडर आणि कुस्करलेले केशरचे धागे टाका. चांगले मिक्स करा आणि थोडे पातळ करण्यासाठी दूध किंवा पाणी घाला.
या पदार्थाचा यादीत समावेश
आमरस व्यतिरिक्त, भारतातील आंब्याची चटणी देखील या यादीत आहे. या यादीत आंब्याची चटणी पाचव्या स्थानावर आहे. अनेकजण आंब्याची चटणी खमंग खातात. त्याची गोड आणि आंबट चव इतर चटण्यांपेक्षा खूप वेगळी आहे आणि ती कंटाळवाणा जेवणाची चव दुप्पट करते. म्हणूनच, जर तुम्ही अद्याप या दोन पदार्थांचा प्रयत्न केला नसेल, तर ते एकदा नक्कीच वापरून पहा.
आंब्याची चटणी कशी बनवायची?
प्रथम कैरी (कच्चा आंबा) सोलून त्याचे छोटे तुकडे करा. कुकरमध्ये तूप टाकून गरम करा आणि तुपात तमालपत्र, मेथी, जिरे आणि मोहरी तळून घ्या. आता त्यात आंब्याचे तुकडे घालून मिक्स करा. नंतर आंब्यामध्ये काळे मीठ, साखर, हळद, मीठ आणि लाल तिखट घालून ढवळा. यानंतर थोडे पाणी घालून कुकरचे झाकण लावून १ शिटी येईपर्यंत शिजवा. कुकरचा प्रेशर संपल्यानंतर कुकर उघडा आणि चटणी चांगली मिक्स करा. गोड आंब्याची चटणी तयार आहे, चपाती आणि स्नॅक्स बरोबर सर्व्ह करा.
[read_also content=”कैरीची ही चटपटीत चटणी तुम्हाला माहित आहे का? सोपी आहे कृती, करून पाहा https://www.navarashtra.com/lifestyle/make-tasty-raw-mango-chutaney-at-home-use-these-easy-tips-nrak-286542.html”]
या पदार्थांना द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला
आंब्यापासून बनवलेल्या इतर चविष्ट पदार्थांनी या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. पण भारतातील हे दोनच पदार्थ आहेत. थायलंडच्या स्टिकी मँगो राईस या डिशने द्वितीय तर फिलीपिन्सच्या सरबेटने तृतीय क्रमांक पटकावला.
TasteAtlas शेअर केलेल्या माहितीनुसार, प्रथम क्रमांकावर आमरस, त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर थायलंडचा मँगो स्टिकी राईस आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर फिलीपिन्सचा आइस्क्रीमआहे. याशिवाय, पश्चिम बंगालमधील आम दल आणि मुंबईतील आंबा चटणी या भारतीय पदार्थांनी देखील या यादीत स्थान मिळवले. (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम)
चौथा क्रमांक- रुजक (जावा, इंडोनेशिया)
पाचवाक्रमांक – आंब्याची चटणी (महाराष्ट्र, भारत)
सहावा क्रमांका -आंबा द्राक्ष (हाँगकाँग, चीन)
सातवा क्रमांका- चायनीज मँगो पुडिंग (ग्वांगडोंग, चीन)
आठवा क्रमांक – रुजक सिंगूर (सुरबाया, इंडोनेशिया)
नववा क्रमांक- बाओबिंग (ग्वांगडोंग, चीन)
दहावा क्रमांक – मामुआंग नाम प्ला वान (थायलंड)






