Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health: ट्रेडमिल की इलेप्टिकल? Weight Loss करण्यासाठीं कोणता कार्डीओ ठरेल सर्वात बेस्ट? जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी ट्रेडमिल आणि इलेप्टिकल दोन्ही उत्तम कार्डिओ मशीन आहेत. ट्रेडमिलवर १ तासात सुमारे ६००-८०० कॅलरीज बर्न होतात आणि हृदयाची गती वेगाने वाढते, तर इलेप्टिकलवर ५००-७०० कॅलरीज बर्न होऊन सांध्यांवर अजिबात ताण पडत नाही. तुमच्या गरजेनुसार योग्य मशीन निवडून तुम्ही वेगाने फॅट लॉस करू शकता.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 05, 2026 | 10:53 PM
Health: ट्रेडमिल की इलेप्टिकल? Weight Loss करण्यासाठीं कोणता कार्डीओ ठरेल सर्वात बेस्ट? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • ट्रेडमिलवर रनिंग करताना तासाला ६००-८०० कॅलरीज बर्न होतात, तर इलेप्टिकलवर ५००-७०० कॅलरीज बर्न होतात.
  • तीव्र धावण्यामुळे ट्रेडमिलवर हृदयाचे ठोके वेगाने वाढतात, तर इलेप्टिकलवर हृदयाची गती स्थिर आणि नियंत्रित राहते.
  • इलेप्टिकल सांध्यांसाठी पूर्णपणे लो-इम्पॅक्ट आणि सुरक्षित आहे, तर ट्रेडमिल धावताना गुडघ्यांवर जास्त दाब टाकते.

आजकाल सर्वजन चांगल्या आरोग्यासाठी म्हणा किनव आकर्षक शरीरयष्टी साठी म्हणा व्यायाम किंवा जिम करत आहे. यामध्ये वजन कमी करण्यासाठी जिम किंवा होम वर्कआउटमध्ये ‘कार्डिओ’ महत्त्वाचा मानला जातो. यासाठी ट्रेडमिल आणि इलेप्टिकल क्रॉस ट्रेनर हे दोन तंत्रज्ञानाने युक्त  लोकप्रिय पर्याय उपलब्ध असतात. पण वजन वेगाने कमी करण्यासाठी या दोघांपैकी काय निवडायचे? जाणून घ्या दोन्ही व्यायामांची सविस्तर तुलना.

कॅलरी लॉस आणि वेळेचे प्रमाण

वजन कमी करण्यासाठी कॅलरी बर्न करणे मुख्य उद्दिष्ट असते.

  • ट्रेडमिल: १ तासाच्या तीव्र रनिंग किंवा इनक्लाइन वॉकिंगमुळे सुमारे ६०० ते ८०० कॅलरीज बर्न होतात.
  • इलेप्टिकल: १ तासाच्या मध्यम ते तीव्र वर्कआउटमध्ये सुमारे ५०० ते ७०० कॅलरीज बर्न होतात.
ट्रेडमिलवर कमी वेळेत जास्त कॅलरी बर्न होतात, तर इलेप्टिकलवर समान कॅलरी कमी करण्यासाठी थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. मात्र जर तुम्ही ट्रेडमिलवर नॉर्मल किंवा थोड्या गतीने चालत असाल तर इलेप्टिकलवर तुलनेने जास्त कॅलरी बर्न होतात.

आपण आपल्या आयुष्यात सरासरी किती किलोमीटर चालतो? जाणून घ्या हे रंजक तथ्य!

हृदयाची गती

कार्डिओचा मुख्य उद्देश हृदयाचे ठोके वाढवून फॅट बर्निंग झोनमध्ये जाणे हा असतो.

  • ट्रेडमिल: पळताना किंवा चढावर चालताना हृदयाचे ठोके खूप वेगाने वाढतात. यामुळे हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग साठी ट्रेडमिल अधिक प्रभावी ठरते.
  • इलेप्टिकल: यावर हृदयाची गती नियंत्रित आणि स्थिर राहते, ज्यामुळे दीर्घकाळ थकवा न येता वर्कआउट करणे शक्य होते.
स्नायूंची हालचाल
  • ट्रेडमिल: यावर प्रामुख्याने शरीराच्या खालच्या भागावर लोअर बॉडीवर भर दिला जातो. यात मांड्या, पायाचे स्नायू, आणि हिप्सच्या स्नायूंचा मोठा सहभाग असतो.
  • इलेप्टिकल: यावर हँडल्सचा वापर केल्यामुळे अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी दोन्हीची एकाच वेळी हालचाल होते. यात पाठीचे स्नायू, बायसेप्स, ट्रायसेप्स आणि कोअर देखील चांगले होतात.
जिम ट्रेनर बनायचंय? ही महत्त्वाची कौशल्ये बाणावी लागतील तुमच्या अंगी! पाहून घ्या टिप्स आणि ट्रिक्स

सांध्यांवरील परिणाम

  • ट्रेडमिल: ट्रेडमिलवर धावताना पायांचे तळवे जमिनीवर आपटल्यामुळे गुडघे, टाच आणि कंबरेवर हाय-इम्पॅक्ट दाब पडतो. ज्यांना सांधेदुखी किंवा दुखापत आहे, त्यांच्यासाठी हा त्रासदायक ठरू शकतो.
  • इलेप्टिकल: ही एक लो-इम्पॅक्ट मशीन आहे. यात पाय पॅडलवरून वर उचलले जात नाहीत, त्यामुळे गुडघे आणि सांध्यांवर अजिबात ताण येत नाही.
शरीरासाठी इतर फायदे
  • ट्रेडमिलचे फायदे: हाडे मजबूत होतात, stamina वाढतो आणि दैनंदिन जीवनातील नैसर्गिक धावण्याचा सराव होतो.
  • इलेप्टिकलचे फायदे: संपूर्ण शरीराचे टोनिंग होते, सांधेदुखीचा त्रास असलेल्यांसाठी आणि नवशिक्यांसाठी हे अत्यंत सुरक्षित आहे.
कोणता पर्याय बेस्ट आहे?

जर तुम्हाला वेगाने कॅलरीज बर्न करायच्या असतील, सांध्यांचा काही त्रास नसेल आणि स्टॅमिना वाढवायचा असेल, तर ट्रेडमिल सर्वोत्तम आहे. परंतु, जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल, वजन जास्त असेल किंवा संपूर्ण शरीराचा सुरक्षित वर्कआउट हवा असेल, तर इलेप्टिकल हा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरेल!

Web Title: Treadmill vs elliptical best cardio workout for weight loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 10:53 PM

Topics:  

  • gymnastics
  • health
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
1

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश
3

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?
4

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.