Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Dengue News: नागपुरात डॉक्टर-विद्यार्थ्यांना लागण, तर सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा मृत्यू!

Maharashtra Dengue News: महाराष्ट्रात डेंग्यूचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. नागपुरात मेडिकलमधील डॉक्टर व विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 03, 2026 | 03:20 PM
Maharashtra Dengue News: नागपुरात डॉक्टर-विद्यार्थ्यांना लागण, तर सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा मृत्यू!

Maharashtra Dengue News: नागपुरात डॉक्टर-विद्यार्थ्यांना लागण, तर सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा मृत्यू!

Follow Us
Follow Us:
  • नागपूर मेडिकलमध्ये डॉक्टर व विद्यार्थ्यांसह ११ जणांना लागण
  • मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे ८ वर्षीय बालकाचा डेंग्यूने मृत्यू
  • गावात फवारणी न झाल्याने ग्रामस्थांची तीव्र नाराजी
Maharashtra Dengue News: महाराष्ट्रामध्ये सध्या डेंग्यूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून नागपूर आणि सोलापूरमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. नागपुरात चक्क जीवरक्षक ठरणाऱ्या मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि परिचारिका प्रशिक्षणार्थींना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात डेंग्यूमुळे एका आठ वर्षीय बालकाचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या वाढत्या घटनांमुळे आरोग्य यंत्रणेच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा: Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!

नागपूर मेडिकलमध्ये डॉक्टर व विद्यार्थ्यांना लागण

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील आरोग्य यंत्रणेत डेंग्यूने शिरकाव केला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत येथील एकूण ११ जणांचे डेंग्यू तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सप्टेंबर महिन्यातील दोन, तर ऑक्टोबर महिन्यातील नऊ रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, बाधितांमध्ये आंतरवासीय डॉक्टर (इंटर्न्स), कनिष्ठ निवासी डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि परिचारिका प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. याशिवाय, केवळ नागपूर शहरातच ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे १२८ नवीन रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या १९३ वर पोहोचली आहे.

हेही वाचा: Dombivli Crime News: ‘तुझा अजून संसार नाही झाला…’ म्हणून मृतदेह लपवला; पण मनाच्या भीतीने आरोपीला करावे लागले आत्मसमर्पण…

सोलापूरमध्ये आठ वर्षीय बालकाचा बळी

दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे डेंग्यूने थैमान घातले असून, आठ वर्षीय इजहार असिफ पठाण या चिमुकल्याचा उपचारादरम्यान डेंग्यूने मृत्यू झाला. तो जिल्हा परिषद शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होता. या लहान मुलाच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. विशेष संतापजनक बाब म्हणजे, बालकाच्या मृत्यूनंतरही प्रशासनाकडून गावात डास नियंत्रणासाठी कोणतीही फवारणी किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गावातील वाढती दुर्गंधी आणि अस्वच्छतेबाबतही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर आणि सोलापूरमधील या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने कठोर पावले उचलत उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. नागरिकांनीही आपल्या घराभोवती आणि परिसरात पाणी साचू न देता काटेकोर स्वच्छता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नागपूर मेडिकलमध्ये डेंग्यूचे किती रुग्ण आढळले आहेत?

    Ans: नागपूर मेडिकलमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत ११ जणांचे डेंग्यू अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यात डॉक्टर व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये शहरात एकूण १९३ रुग्ण झाले आहेत.

  • Que: सोलापूरमध्ये डेंग्यूमुळे कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे आठ वर्षीय इजहार असिफ पठाण या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या बालकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला.

  • Que: नागरिकांनी कोणती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे?

    Ans: डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी परिसरात पाणी साचू न देता पूर्ण स्वच्छता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra dengue outbreak nagpur medical doctors solapur child death sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Dengue Virus
  • health
  • maharashtra news
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
1

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद
2

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद

Nagpur News : दिवाळीत घरी येणे महागणार हवाई प्रवासाचे भाडे ११ ते १७ हजारांवर; बसचे तिकीटही ५ हजारांवर
3

Nagpur News : दिवाळीत घरी येणे महागणार हवाई प्रवासाचे भाडे ११ ते १७ हजारांवर; बसचे तिकीटही ५ हजारांवर

Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी
4

Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.