Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diabetes in Kids: मुलांमध्ये वाढतोय Type 1 डायबिटीस, शाळा आणि प्रवासादरम्यान कशी घ्याल काळजी

लहान मुलांनाही मधुमेह हा आजार होतोय आणि हा आजार शरीर पोखरू लागतो. टाइप १ डायबिटीसची काळजी कशा पद्धतीने घ्यायची आणि मुलांसाठी त्याचे व्यवस्थापन कसे करावे जाणून घ्या तज्ज्ञांकडून

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 23, 2026 | 04:38 PM
टाइप १ डायबिटीस मुलांमध्ये व्यवस्थापन कसे करावे (फोटो सौजन्य - iStock)

टाइप १ डायबिटीस मुलांमध्ये व्यवस्थापन कसे करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • डायबिटीसची काळजी कशी घ्यावी 
  • मुलांमध्ये वाढतोय टाइप १ डायबिटीसचा धोका 
  • डायबिटीसचा हा आजार मुलांपासून कसा दूर ठेवायचा 
टाइप-१ मधुमेह हा प्रामुख्याने लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये आढळणारा आजार आहे. मात्र, योग्य उपचार, नियमित रक्तातील साखरेचे परीक्षण, संतुलित आहार, शारीरिक हालचाल आणि इन्सुलिनच्या मदतीने या आजाराचे अचूक व्यवस्थापन करता येते. 

विशेष म्हणजे, पालक, शिक्षक आणि कुटुंबियांचे योग्य सहकार्य मिळाल्यास टाइप-१ मधुमेह असलेली मुले इतर मुलांप्रमाणेच शाळेत जाऊ शकतात, खेळू शकतात, प्रवास करू शकतात आणि दैनंदिन जीवनातील सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. डॉ. कोचुराणी अब्राहम, पेडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट, अंकुरा हॉस्पिटल फॉर वूमेन अँड चिल्ड्रन, औंध, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

टाइप – १ मधुमेह नेमके काय आहे 

टाइप-१ मधुमेह हा एक ऑटोइम्यून आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील (पॅन्क्रियाज) इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. त्यामुळे शरीरात इन्सुलिनची कमतरता निर्माण होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. हा आजार जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे होत नाही. तो प्रामुख्याने मुले आणि तरुणांमध्ये आढळून येतो आणि त्यासाठी आयुष्यभर इन्सुलिनची आवश्यकता असते.

मुळापासून कसे उपटून काढाल Diabetes? बाबा रामदेवांनी दिला रामबाण उपाय, करून पहाच

लक्षणे काय आहेत

या आजाराची लक्षणे ओळखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वारंवार लघवी होणे, खूप तहान लागणे, सतत भूक लागणे, विनाकारण वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे, दृष्टी धूसर होणे आणि वारंवार संसर्ग होणे ही टाइप-१ मधुमेहाची काही प्रमुख लक्षणे आहेत. वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास डायबेटिक केटोअॅसिडोसिस (डीकेए), तीव्र निर्जलीकरण, रक्तातील साखर अचानक कमी होणे तसेच डोळे, मूत्रपिंड, मज्जातंतू आणि हृदयावर दीर्घकालीन परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो.

शाळेत टाइप-१ मधुमेहाचे व्यवस्थापन

टाइप-१ मधुमेह असलेल्या मुलांसाठी शाळेतील वातावरण सुरक्षित आणि त्यांना समजून घेणारे असणे गरजेचे आहे. पालकांनी मुलाच्या आरोग्याविषयीची माहिती वर्गशिक्षक, शाळेतील वैद्यकीय पथक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना द्यावी. त्यांना मुलांनधील रक्तशर्करेची पातळी कमी होणे लक्षणे ओळखणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने योग्य उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे.

मुलांकडे नेहमी एक आपत्कालीन किट असणे आवश्यक आहे. या किटमध्ये इन्सुलिन, रक्तातील साखर तपासण्याचे उपकरण, ग्लुकोजच्या गोळ्या किंवा ग्लुकोन-डी पावडर, पौष्टिक खाऊ, पाण्याची बाटली आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक असावेत. इन्सुलिन घेतल्यानंतर जेवण चुकवू नये, याची विशेष काळजी घ्यावी.

टाइप-१ मधुमेहामुळे मुलांना शाळेतील कोणत्याही उपक्रमापासून दूर ठेवण्याची गरज नाही. खेळ, सहली आणि इतर सर्व शालेय कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. तसेच, शाळेत इन्सुलिन घेण्यासाठी सुरक्षित आणि गोपनीय जागेची व्यवस्था असणेही आवश्यक आहे. मुलांना कोणताही त्रास झाल्यास त्यांनी तात्काळ शिक्षक किंवा वैद्यकीय पथकाला माहिती देण्याची सवय लावणे महत्त्वाचे आहे. मित्र-मैत्रीणींकडून होणारी चेष्टा किंवा भेदभाव याविरोधात शाळेने संवेदनशील आणि कठोर भूमिका घेतली पाहिजे.

चालताना शरीरात ‘ही’ लक्षणे जाणवली तर समजून जा Diabetes तुमच्यावर हल्ला करत आहे! लगेच करून घ्या शुगर टेस्ट

प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी

  • टाइप-१ मधुमेह असलेल्या मुलांसोबत प्रवास करताना योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रवासासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात इन्सुलिन, सिरिंज किंवा इन्सुलिन पेन, रक्तशर्करा तपासण्याची उपकरणे, त्यासाठी लागणाऱ्या बॅटऱ्या, पौष्टिक खाऊ आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवावे
  • विमान प्रवास करताना मधुमेहाशी संबंधित औषधे आणि साहित्य चेक-इन सामानाऐवजी हँड बॅगेजमध्ये ठेवणे अधिक सुरक्षित ठरते. लांबच्या प्रवासात, विशेषतः वेळेच्या पट्ट्यात बदल होत असल्यास, रक्तातील साखरेची नियमित तपासणी करणे आवश्यक असते. मुलांनी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आणि वेळेवर आहार घेणे याकडे विशेष लक्ष द्यावे
  • रस्त्याने प्रवास करताना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी आणि पौष्टिक खाऊ जवळ ठेवावेत. नवीन ठिकाणी जात असल्यास जवळील रुग्णालये आणि औषधांची दुकाने यांची माहिती आधीच घेऊन ठेवणे उपयुक्त ठरते
  • टाइप-१ मधुमेह असलेल्या मुलांना योग्य उपचार, नियोजन आणि कुटुंबीय व शिक्षकांच्या पाठबळामुळे पूर्णपणे सामान्य आणि सक्रिय जीवन जगणे शक्य आहे. थोडी अधिक काळजी, योग्य माहिती आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या मदतीने ही मुले शिक्षण, खेळ आणि प्रवासाचा आनंद घेऊ शकतात

Web Title: Type 1 diabetes is on the rise among children how to take care during school and travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • diabetes
  • Health Tips

संबंधित बातम्या

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
1

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
2

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?
3

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली
4

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.