बाबा रामदेव यांचे डायबिटीसवरील उपाय (फोटो सौजन्य - iStock)
डायबिटीस हा सध्या जगभरात वेगाने वाढणारा आजार आहे. याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमच्या जीवाची हेळसांड करत आहात हे विसरू नका. त्यामुळे डायबिटीस असेल तर त्याचा मुळापासून कसा नायनाट करायचा यासाठी हा लेख नक्की वाचा.
ही योगासने आराम देतील
योगगुरू बाबा रामदेव यांनी मधुमेह नियंत्रित कसा करायचा हे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले आहे की फक्त दोन योगासने करून तुम्ही मधुमेह नियंत्रित करू शकता. ही दोन योगासने म्हणजे मंडुकासन आणि पवनमुक्तासन. या दोन योगासने नियमितपणे केल्याने मधुमेह पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. तसेच, आयुर्वेदिक रस आणि औषधी वनस्पतींचे सेवन करा.
शरीरातील कोणकोणत्या भागांवर दिसतात डायबिटीसची लक्षणं? प्रत्येकाने जाणून घेणे महत्वाचे
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी रस
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी, तुम्ही घरी भाज्यांचे रस बनवून ते पिऊ शकता. रस तयार करण्यासाठी, काकडी, कारले आणि टोमॅटो घ्या आणि रस काढा. मधुमेहींनी नंतर ते सेवन करावे. नियमितपणे हा रस सेवन केल्याने साखरेची पातळी त्वरित नियंत्रित होईल. टॉमेटोचे गुणधर्म डायबिटीस कमी करण्यास उपयुक्त ठरतात. डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी टॉमेटोचे नियमित सेवन केल्यास लवकरच तो कमी होतो
मधुमेहासाठी चमत्कारी औषधी वनस्पती
आयुर्वेदामध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरतात. यासाठी तुम्ही आवळा, कोरफड, गुळवेल, चिरायता, कुटकी, गुडमार आणि विजयसर वापरू शकता. या सर्व वनस्पती साखर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त मानल्या जातात. आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर डायबिटीसच्या रुग्णांना अधिक चांगला ठरतो. जास्त डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीही या वनस्पतींचा वापर करून डायबिटीसचे प्रमाण कमी करू शकता आणि डायबिटीसचा नाश करण्यास याचा उपयोग करता येईल.
40% लोकांना Diabetes झाल्याचे माहीतच नाही, 35 वय असेल तर ‘हे’ महत्त्वाचे काम कराच!
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






