मंगळागौरीच्या दिवशी महिला सुंदर नटून थटून तयार होतात. तसेच वेगवेगळ्या खेळ खेळून आनंद व्यक्त करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मंगळागौरीला घेण्यासाठी काही सुंदर उखाणे सांगणार आहोत.
संपूर्ण देशभरात मोठ्या आनंद आणि उत्साहात श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. पावसाच्या सरी अंगावर पडू लागल्यानंतर सगळ्यांचं जशी गणपतीच्या आगमनाची ओढ लागते, तशीच ओढ श्रावण महिना सुरु झाल्यानंतर मंगळागौरीच्या पूजेची लागते. श्रावण महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा करून बेल आणि दूध अर्पण केले जाते. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेशोत्सव इत्यादी अनेक सण असतात. तसेच राज्यातील अनेक ठिकाणी मंळागौर खेळाचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात नवीन लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर पूजा घातली जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या कोणत्याही मंगळवारी मंगळागौर पूजा तुम्ही करू शकता. यादिवशी सर्व महिला एकत्र येऊन झिम्मा, फुगडी आणि गाणी गात सुंदर मंगळागौर साजरा करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मंगळागौरनिमित्त काही सुंदर उखाणे सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
चल गं बाई खेळू या, मंगळागौर खेळू या
… रावांचे नाव घेते, आमच्या जोडीला तुमचे आशीर्वाद द्या
श्रावण महिन्यात सजला मंगळागौरीचा थाट
… रावांचं नाव घ्यायला मी कशाला बघू वाट
भर श्रावणात, पाऊस आला जोरात
… रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या दिवशी … च्या घरात.