वाढदिवसाच्या दिवशी केकवरील मेणबत्ती का विझवली जाते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण
वाढदिवसाच्या दिवशी केकवरील मेणबत्ती विझवण्याची प्रथा प्राचीन ग्रीस मधून सुरू झाली होती. मेणबत्तीचा प्रकाश हा 'जीवनाचा प्रकाश' असे कायमच मानले जाते. केकवरील मेणबत्ती विझवल्यामुळे भविष्यातील चांगल्या आरोग्यासाठी व सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते.
केकवरील मेणबत्ती विझवल्यानंतर त्यातून निघणारा धूर वरच्या दिशेने जातो आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. केकवर लावलेल्या सर्व मेणबत्त्या केले फुंकरमध्ये विझल्या तर मनातल्या इच्छा लवकर पूर्ण होतात.
काही ठिकाणी मेणबत्तीच्या धुरामुळे आजूबाजूला असलेल्या वाईट शक्ती किंवा दुष्ट आत्मे दूर होतात, असे सुद्धा मानले जाते. यामुळे व्यक्तीचे रक्षण होते.
केकवर लावण्यात आलेली प्रत्येक मेणबत्ती आयुष्यातून निघून गेलेल्या एका वर्षाची आठवण असते. गेलेल्या वर्षाला निरोप देणे, असा त्याचा अर्थ होतो.
भारतात पूर्वीच्या काळी पूजा करून वाढदिवस साजरा केला जायचा. त्यानंतर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत गेला आणि केक इत्यादी अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल झाले.