शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात का साजरा केला जातो?
चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सगळीकडे रामनवमी उत्सव साजरा केला जातो. यादिवशी देशातील सर्व राममंदिरांमध्ये रामाचा जन्मउत्सव साजरा केला जातो. रामाची विधिवत पूजा करून वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य रामाला अर्पण केला जातो. प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णूचर अवतार असून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात. दरवर्षी 6 एप्रिल ला रामनवमी साजरा केली जाते, कारण या दिवशी प्रभू राम जन्माला आले होते. राज्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेले मंदिर म्हणजे शिर्डीचे साईबाबा. रामानवमीनिमित्त शिर्डीमध्ये वेगळाच उत्साह आणि आनंद असतो. यादिवशी साईबाबांच्या मंदिरात विशेष आरती आणि भजनाचे आयोजन केले जाते.(फोटो सौजन्य- istock)
रामनवमीचा उत्सव देशभरात कोणकोणत्या ठिकाणी साजरा केला जातो? काय आहे परंपरा
1911 पासून शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे. शिर्डीमध्ये श्रीराम नवमी, गुरुपौर्णिमा व विजयादशमी हे प्रमुख तीन उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केले जातात. साईबाबांच्या मंदिरात साईभक्त रामदेवाला प्रार्थना करतात आणि रामायणाच्या महाकाव्याचा पाठण करून पूजा केली जाते. शिर्डीच्या साईबाबांच्या आयुष्यातील रामनवमीचा दिवस हा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो. या उत्सवानिमित्त मंदिरामध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. भजन आणि कीर्तिनाच्या तालामध्ये संपूर्ण रामनवमी उत्सव शिर्डीमध्ये पार पडतो.
राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये रामनवमीच्या दिवशी भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी मंदिर संपूर्ण रात्रभर खुले असते.चैत्र नवरात्रीच्या नव्या दिवशी उगवत्या चंद्रावर येणारा रामनवमी सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. शिर्डीमध्ये रामनवमी साजरा करण्याची परंपरा राधाकृष्ण माई यांनी सुरु केली होती. मात्र त्यांनी सुरु केलेली परंपरा अजूनही शिर्डीमध्ये चालू आहे. राम हे धर्म, न्याय आणि सदाचाराचे प्रतीक आहे. शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव 3 ते 4 दिवस साजरा केला जातो.
Ram Navami: छंद नाही रामाचा तो देह….! रामनवमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा
1897 मध्ये अनेक वर्षांपासून मुलं होत नसलेले गोपाळराव गुंड याना अनेक वर्षांच्या प्रार्थनेनंतर त्यांच्या घरात मुलं जन्माला आले. त्यानंतर साईबाबांच्या कृपेने आपल्याला मूळ झालेली अशी मान्यता गोपाळराव गुंड यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर साईबाबांची परवानगी घेऊन मेळ्याच्या स्वरूपात आभारोत्सव साजरा करण्यात आला. मात्र त्याच दिवशी निधन पावलेल्या संताच्या सन्मानार्थ उरुसाचे आयोजन देखील करण्यात आले होते. दोन्ही समुदाय एकत्र येण्यासाठी साईबाबांनी ही युक्ती लढवली होती.साईबाबांच्या जत्रेचा दिवस म्हणजे रामनवमी उत्सव. त्यामुळे अनेक वर्षांपासून शिर्डीमध्ये मोठ्या आनंद आणि उत्साहात रामननवमी सण साजरा केला जात आहे.