देशभरात सगळीकडे मोठ्या आनंद आणि उत्साहात रामनवमी साजरी केली जाते. यादिवशी रामाची पूजा करून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सगळीकडे रामनवमी साजरा करतात. अयोध्येच्या राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या घरी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णूचर अवतार असून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात. या दिवशी मंदिरांमध्ये आकर्षक सजावटी करून रामाच्या कपाळावर सूर्यकिरणांचा अभिषेक केला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रामनवमीनिमित्त शुभेच्छा देणारे काही संदेश सांगणार आहोत. हे नक्की वाचा. (फोटो सौजन्य – social media,canva)
श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट,श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,राम सर्वस्व आहे..राम सुरुवात आहे आणिराम शेवट आहे.श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
अंश विष्णूचा राम धरेची दुहिताती सीता गंधर्वाचे सूर लागले, जय गीतं गाता आकाशाशी,जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
रामाप्रती भक्ती तुझी ।राम राखे अंतरी ।रामासाठी भक्ती तुझी ।राम बोले वैखरी ।श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!