Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साबुदाणा खिचडी खायला आवडत नाही? मग यंदा घरी बनवा स्वादिष्ट साबुदाण्याचे थालीपीठ; अनोख्या चवीने सर्वच होतील खुश

उपवासासाठी परिपूर्ण आणि झटपट होणारी रेसिपी शोधत असाल तर साबुदाणा थालीपीठ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चवीने भरपूर ही डिश पोट भरण्याचेही काम करते. उपवासासाठी नवीन डिश शोधत असाल तर आताच ही रेसिपी ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 06, 2025 | 12:21 PM
साबुदाणा खिचडी खायला आवडत नाही? मग यंदा घरी बनवा स्वादिष्ट साबुदाण्याचे थालीपीठ; अनोख्या चवीने सर्वच होतील खुश

साबुदाणा खिचडी खायला आवडत नाही? मग यंदा घरी बनवा स्वादिष्ट साबुदाण्याचे थालीपीठ; अनोख्या चवीने सर्वच होतील खुश

Follow Us
Follow Us:

उपवास म्हटलं की साबुदाण्याचे विविध पदार्थ आठवतात. यातही साबुदाणा खिचडी ही सामान्य डिश. उपवास म्हटलं की घरी साबुदाणा खिचडी बनलीच म्हणायची… पण बऱ्यादा ही खिचडी कंटाळवाणी वाटू लागते आणि मग उपवासाला काहीतरी चवदार खाण्याची इच्छा होते. साबुदाण्यापासून तुम्ही अनेक वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता आणि आज आम्ही तुमच्यासाठी साबुदाणा थालीपीठची रेसिपी घेऊन आलो आहोत जी चवीला फार छान लागते.

शिमला मिरची खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये भाजलेल्या शिमला मिरचीपासून बनवा चमचमीत चटणी

खरपूस भाजून तयार केलेले हे थालीपीठ घरातील सर्वांनाच फार आवडतील. ही रेसिपी उपवासात झटपट बनते, पौष्टिकही असते आणि खाताना खमंग लागते. साबुदाणा, बटाटा आणि शेंगदाण्यांच्या मिश्रणातून तयार होणारे हे थालिपीठ उपवासासाठी एक परिपूर्ण आणि पोटभर पर्याय ठरतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • साबुदाणा – १ कप (पाण्यात भिजवून ५-६ तास हलके मऊ केलेला)
  • उकडलेला बटाटा – २ मध्यम
  • शेंगदाण्याचं कूट – ¼ कप
  • हिरवी मिरची – २ (कापून)
  • साखर – ½ टीस्पून (ऐच्छिक)
  • मीठ – चवीनुसार (सेंधा मीठ वापरावे)
  • लिंबाचा रस – १ टीस्पून (ऑप्शनल)
  • कोथिंबीर – थोडी (उपवासात चालत असल्यास)
  • तूप/शेंगदाण्याचं तेल – थालिपीठ शेकण्यासाठी
नावडती भाजीही होईल आवडीची; एकदा बनवून तर पहा भरलेली भेंडी

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम साबुदाणा ५-६ तास भिजवून मऊ करून घ्या. हाताने चिरडून बारीक करावा.
  • एका बाउलमध्ये भिजवलेला साबुदाणा, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस एकत्र करा
  • सर्व साहित्य मिक्स करून घट्टसर गोळा तयार करा.
  • प्लास्टिकच्या शीटवर किंवा केळीच्या पानावर थोडं पाणी लावून त्यावर थालिपीठ आकारा. हाताने थोडं पाणी
  • लावून पातळ थापून घ्या. मधोमध एक भोक पाडा (वाफ बाहेर जाण्यासाठी).
  • तवा गरम करून त्यावर थालिपीठ हळुवार टाका. बाजूने थोडं तूप किंवा शेंगदाण्याचं तेल सोडा. झाकण ठेवून
  • मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा.
  • गरम साबुदाणा थालिपीठ दही किंवा उपवासातील लोणच्यासोबत सर्व्ह करा.
  • साबुदाणा थोडा मोकळा असेल तर थालिपीठ तुपात खमंग लागते.
  • अधिक कुरकुरीतपणा हवं असेल तर थालिपीठ थोडसं पातळ थापा.
  • कोथिंबीर टाळून ही रेसिपी पूर्ण उपवासासाठी योग्य होईल.

Web Title: Upvas special make tasty sabudana thalipeeth at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.