
सांध्यांमध्ये वाढलेले Uric Acid महिनाभरात लघवीवाटे पडून जाईल बाहेर! रोजच्या आहारात करा 'या' भाज्यांचे नियमित सेवन
बऱ्याचदा आरोग्यासंबंधित अचानक वाढलेल्या वेदना गंभीर आजारांचे कारण बनतात. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अचानक हाडांमध्ये वेदना होणे, गुडघे दुखणे, कंबर दुखणे, संधिवाताच्या वेदना जाणवू लागतात. शरीरात थकवा वाढणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. रक्तात वाढलेली युरिक ॲसिडची पातळी हळूहळू सांध्यांमध्ये गाऊट तयार करते.युरिक ॲसिड सांध्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर गाऊट, सूज, सांधेदुखी, अगदी किडनीचे आजार वाढू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात वाढलेले युरिक ॲसिड लघवीवाटे बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात कोणत्या भाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाज्यांच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाईल.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात काकडी उपलब्ध असते. काकडीचे सेवन केल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. कारण यामध्ये ९० टक्के पाणी असते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी काकडीचे सेवन करावे. काकडीच्या सेवनामुळे किडनीला आलेली सूज कमी होते. तसेच रोज सकाळी उठल्यानंतर काकडीचा रस नियमित प्यायल्यास लघवीवाटे युरिक ऍसिड शरीरातून बाहेर पडून जाईल. काकडी खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला अनेक फायदे सुद्धा होतात.
सॅलड बनवल्यानंतर त्यात आवर्जून गाजर टाकले जाते. गोड चवीचा गाजर केवळ डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी नाहीतर संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरतो. गाजरमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि विटामिन ए इत्यादी अनेक घटक आढळून येतात. गाजर खाल्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम वाढवते आणि सांध्यांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते. गाऊट आणि सांधेदुखीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी नियमित गाजर खावे.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. आंबट गोड चवीचे टोमॅटो जेवणाची चव वाढवते. यामध्ये लायकोपीन आणि विटामिन सी इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शरीरात वाढलेली आम्ल्पित्ता कमी करण्यासाठी टोमॅटोचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर नियमित टोमॅटोचा रस प्यायल्यास यकृत आणि किडनी दोन्हीचे कार्य सुधारते. किडनी स्वच्छ करण्यासाठी टोमॅटोचे सेवन करावे.
श्वासावर विषारी हवेचा विनाशकारी प्रभाव, Baba Ramdev यांचे अचून उपाय, दिला मोलाचा सल्ला
कडू चवीचे कारलं कोणालाच खायला आवडत नाही. कारल्याचे नाव ऐकल्यानंतर लहान मुलं तोंड वाकड करतात. कारल्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. कारलं खाल्यामुळे किडनी मजबूत होते आणि शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी अनेक लोक कारल्याच्या रसाचे सेवन करतात.
युरिक ऍसिड म्हणजे काय?
शरीरातील प्युरीन नावाचे घटक तुटल्यावर युरिक ऍसिड तयार होते.हे मूत्रपिंडांमधून गाळून लघवीद्वारे शरीराबाहेर टाकले जाते.
युरिक ऍसिडची लक्षणे काय आहेत?
सांधेदुखी, सूज आणि कडकपणा, विशेषतः मोठ्या पायाच्या बोटात.गाउटचा त्रास.मूत्रपिंडात खडे (किडनी स्टोन).
युरिक ऍसिड कसे कमी करावे?
प्युरीन-समृद्ध पदार्थ, जसे की रेड मीट, सीफूड आणि अवयवांचे मांस मर्यादित करा.साखरयुक्त पेये आणि गोड पदार्थ टाळा.फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा, कारण ते युरिक ऍसिड कमी करण्यास मदत करू शकतात.