Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cancer Cure: कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात दिलासादायक बातमी; स्वादुपिंडाच्या कर्करोगावर गुणकारी ‘रासॉन्क’ गोळीला अमेरिकन FDA ची मंजुरी

pancreatic cancer : एफडीएने मेटास्टॅटिक स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठी रेव्होल्यूशन मेडिसिन्सच्या 'रासॉन्क' या औषधाला मंजुरी दिली आहे. चाचण्यांमध्ये या औषधामुळे रुग्णांचा जगण्याचा दर दुप्पट झाला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 27, 2026 | 12:22 PM
US FDA approves Revolution Medicines' drug 'Rasonc' for metastatic pancreatic cancer

US FDA approves Revolution Medicines' drug 'Rasonc' for metastatic pancreatic cancer

Follow Us
Follow Us:
  • कॅन्सर उपचारात ऐतिहासिक यश
  • रुग्णांचा जगण्याचा दर दुप्पट
  • ३८ लाखांचा डोस व आर्थिक मदत

कर्करोगासारख्या (Cancer)  जीवघेण्या आजाराविरुद्धच्या जागतिक लढ्यात वैद्यकीय शास्त्राला एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यश मिळाले आहे. वैद्यकीय विश्वात अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या मेटास्टॅटिक स्वादुपिंडाच्या (Pancreatic) कर्करोगावर मात करण्यासाठी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) ‘रेव्होल्यूशन मेडिसिन्स’ (Revolution Medicines) या कंपनीच्या ‘रासॉन्क’ (Rasonque / Daraxonrasib) या नवीन तोंडावाटे घ्यायच्या औषधाला अधिकृत मंजुरी दिली आहे. स्वादुपिंडाचा कर्करोग हा सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे कठीण असते आणि तो वेगाने पसरत असल्याने त्यावर प्रभावी उपचार शोधणे हे शास्त्रज्ञांपुढे अनेक दशकांपासून मोठे आव्हान होते. आता एफडीएच्या या निर्णयामुळे जगभरातील कर्करोगग्रस्त रुग्णांना एक नवीन आशेचा किरण मिळाला आहे.

वैद्यकीय चाचण्यांमध्ये (Phase 3 Trials) या औषधाचे परिणाम पाहून जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञ अचंबित झाले आहेत. प्रगत अवस्थेतील आणि आधी केमोथेरपी घेतलेल्या स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांवर जेव्हा या गोळीचा प्रयोग करण्यात आला, तेव्हा रुग्णांचा जगण्याचा दर आणि कालावधी थेट दुप्पट झाल्याचे दिसून आले. पारंपारिक केमोथेरपी उपचारांच्या तुलनेत या औषधाने कर्करोगाच्या गाठींची वाढ रोखण्यात आणि रुग्णांचे आयुष्य वाढवण्यात अभूतपूर्व यश मिळवले आहे. दिवसातून फक्त एकदाच घ्यायची ही गोळी अशा रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल ज्यांना तीव्र केमोथेरपीचे दुष्परिणाम सहन होत नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood: ‘नेपाळमधील धोका टळला नाही…’ येऊ शकतो आणखी एक विनाशकारी पूर? शास्त्रज्ञांनी दिला मोठा इशारा

महागडे औषध पण रुग्णांना नवसंजीवनी

या औषधाच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, रेव्होल्यूशन मेडिसिन्सने ‘रासॉन्क’ गोळीच्या ३० दिवसांच्या डोसची किंमत ३९,८०० अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ३८ लाख रुपये) निश्चित केली आहे. ही किंमत सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत प्रचंड असली, तरी कर्करोगाच्या पेशींवर अचूक मारा करणाऱ्या या अत्याधुनिक ‘टारगेटेड थेरपी’चे संशोधन आणि विकास अत्यंत खर्चिक प्रक्रिया आहे. तथापि, कंपनीने स्पष्ट केले आहे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना हे औषध उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी एका विशेष सहकार्य आणि आर्थिक मदत कार्यक्रमाची (‘ONPath Program’) घोषणा केली आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना हे औषध परवडणाऱ्या दरात मिळण्यास मदत होईल.

या गोळीचा प्रत्यक्षात वापर करणाऱ्या रुग्णांचे अनुभवही अत्यंत सकारात्मक आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या ८८ वर्षांच्या बार्बरा अँडेस (Barbara Andes) या स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांनी सलग एक वर्ष केमोथेरपीचा अत्यंत त्रासदायक उपचार घेतला होता. परंतु, जुलै महिन्यात त्यांनी या नवीन ‘रासॉन्क’ गोळीचा डोस सुरू केला. त्यांनी आपला अनुभव सांगताना नमूद केले की, या गोळीमुळे त्यांना होणारी तीव्र मळमळ आणि सतत जाणवणारा अशक्तपणा खूपच कमी झाला आहे. आता त्या आपली दैनंदिन कामे स्वतः करू शकत असून, त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारला आहे. “हे औषध हजारो रुग्णांसाठी एक आशीर्वाद ठरत आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Floods : नेपाळमध्ये विनाशकारी विध्वंस घडवणारी हिमनदीची दुर्घटना नक्की काय आहे? समजून घ्या कसे तुटतात ‘हे’ ग्लेशियर

जलद मंजुरी प्रक्रिया आणि कर्करोगावर अचूक मारा

सामान्यतः एफडीएद्वारे कोणत्याही नवीन कर्करोगाच्या औषधाचे सर्व निकष तपासून त्याला मंजुरी देण्यास १० ते १२ महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी लागतो. परंतु, या औषधाचे अद्भूत परिणाम आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगावरील उपचारांची निकड लक्षात घेऊन एफडीएने आपल्या नवीन ‘फास्ट-ट्रॅक / नॅशनल प्रायोरिटी’ पुनरावलोकन प्रक्रियेद्वारे (Priority Review) अवघ्या १ ते २ महिन्यांत या गोळीला मंजुरी दिली. रेव्होल्यूशन मेडिसिन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. मार्क गोल्डस्मिथ यांनी सांगितले की, “ही मंजुरी म्हणजे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा मुख्य मुख्य घटक असलेल्या ‘RAS-प्रोटीन’च्या म्युटेशनला रोखण्यासाठी गेल्या एका दशकाहून अधिक काळ केलेल्या अथक परिश्रमांचे फलित आहे.”

आर्थिक विश्लेषकांच्या मते, या औषधाच्या मंजुरीमुळे आणि बाजारातील वाढत्या मागणीमुळे चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल २८ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचण्याची शक्यता आहे. तर दीर्घकाळात हे औषध जगभरात ११.५ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय करू शकते. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अहवालानुसार, एकट्या अमेरिकेत यावर्षी अंदाजे ६७,३५० नवीन रुग्णांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान होण्याची शक्यता आहे. अशा वेळी रासॉन्क हे औषध जागतिक आरोग्य क्षेत्रात एक क्रांती घडवून आणणारे ठरत आहे.

Web Title: Us fda approves rasonque pancreatic cancer drug price details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • America
  • Cancer prevention
  • Health News

संबंधित बातम्या

LDL cholesterol: बाहेरच खात नाही तरी खराब कोलेस्ट्रॉल वाढतंय? तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?
1

LDL cholesterol: बाहेरच खात नाही तरी खराब कोलेस्ट्रॉल वाढतंय? तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?

America : हैतीमध्ये सशस्त्र टोळीचा हैदोस! 47 जणांची निर्घृण हत्या अन् 50 हून अधिक जणांचे अपहरण; संयुक्त राष्ट्राकडून तीव्र निषेध
2

America : हैतीमध्ये सशस्त्र टोळीचा हैदोस! 47 जणांची निर्घृण हत्या अन् 50 हून अधिक जणांचे अपहरण; संयुक्त राष्ट्राकडून तीव्र निषेध

कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…
3

कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?
4

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.