चेहऱ्यावर या पद्धतीने लावा तुरटी:
वातावरणात होणारे बदल, वाढलेला उन्हाळा, शरीरातील उष्णता, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर दिसून आल्यानंतर लगेच पिंपल्स किंवा ऍक्ने येण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले मोठं मोठं पिंपल्स कितीही उपाय केले तरीसुद्धा लवकर निघून जात नाहीत. पिंपल्स त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब करून टाकतात. यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी वाटू लागते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आतून स्वच्छ न झाल्यामुळे ते पुन्हा एकदा येण्याची शक्यता असते. त्यामुळे पिंपल्स घालवण्यासाठी तुरटीचा वापर करावा.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात घामामुळे त्वचा चिकट होते? त्वचेवर रॅश येतात? तेलकट त्वचेवर लावा ‘हे’ घरगुती पदार्थ
तुरटीमध्ये असलेले गुणधर्म त्वचा तुन आणि बाहेरून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. त्वचेचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. तुरटीच्या वापरामुळे त्वचा स्वच्छ होते. तुरटीमध्ये अॅंटी-सेप्टिक आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे मोठे मोठे पिंपल्स, ऍक्ने कायमचे निघून जातात. आज आम्ही तुम्हाला त्वचेसाठी तुरटीचा वापर कसा करावा? तुरटी लावल्यामुळे त्वचेला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
तुरटीचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. रात्री झोपण्याआधी तुरटी त्वचेवर लावल्यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्सचे डाग, मुरुमांचे डाग कायमचे निघून जातील आणि त्वचा स्वच्छ होईल. तुरटी त्वचेवर लावताना सर्वप्रथम तुरटीचा एक तुकडा पाण्यात भिजवून दगडावर घासा. त्यानंतर तुरटीच्या मिश्रणात गुलाब पाणी मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून रात्रभर तसेच ठेवून द्या. सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास त्वचेसंबंधित समस्या कायमच्या दूर होतील.
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी तुरटीचा वापर करावा. तुरटी त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारून त्वचा आतून स्वच्छ करते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, डाग, मुरूम कमी करण्यासाठी तुरटीचा वापर करा. त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये साचून राहिलेली धूळ, माती स्वच्छ करण्याचे काम तुरटी करते. ज्यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि ऍक्नेचे डाग कमी होण्यास मदत होते.
त्वचेवर साचून राहिलेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी तुरटी प्रभावी आहे. उन्हाळ्यात त्वचा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन जाते. चिकट झालेल्या त्वचेवर मोठ्या प्रमाणात पिंपल्स आणि मुरूम येतात. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. तुरटीमुळे ब्लॅकहेड्स लगेच निघून जातात.