उन्हामुळे काळीकुट्ट झालेली त्वचा पुन्हा चमकवण्यासाठी 'या' घरगुती पदार्थांचा करा वापर
उन्हाळा वाढल्यानंतर प्रामुख्याने उद्भवणारी त्वचेसंबंधित समस्या म्हणजे सनटॅनिंग. बाहेरील कडक उन्हाचा प्रभाव त्वचेवर लगेच दिसून येतो, ज्यामुळे त्वचा अधिक काळी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेचा रंग बदलल्यानंतर तो पुन्हा उजळ्वण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर फिरायला जाताना किंवा कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी. सनस्क्रीन लावणे, भरपूर पाण्याचे सेवन करणे, तोंडाला स्कर्फ बांधून बाहेर जाणे इत्यादी गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेचे नुकसान होणार नाही. सतत उन्हात बाहेर गेल्यामुळे त्वचा काळी होऊन चेहऱ्यावर काळा थर जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
‘या’ विटामिनच्या कमतरतेमुळे केसांमध्ये वाढू शकतो कोंडा! केसांचे होईल गंभीर नुकसान
मध त्वचेचा रंग उजळ्वण्यासाठी मदत करतो. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग, काळी पडलेली त्वचा उजळ्वण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यासाठी वाटीमध्ये मध घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटं तसेच ठेवून द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केल्यास त्वचेचा रंग उजळून चेहरा चमकदार दिसेल.
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी दही बेसन पॅक प्रभावी ठरेल. बेसन लावल्यामुळे त्वचेवरील काळवंडलेली त्वचा उजळदार होईल आणि चेहरा स्वच्छ दिसेल. बेसन पॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये 1 चमचा बेसन घेऊन त्यात दही टाकून मिक्स करा. मिक्स करून घेतल्यानंतर संपूर्ण मिश्रण चेहऱ्यावर लावा. 5 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून तीनदा केल्यास त्वचेवरील टॅनिंग कमी होईल.
उन्हाळा वाढल्यानंतर त्वचेमध्ये जळजळ होणे, चेहरा लाल होणे किंवा रॅशेस येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे त्वचा खराब होऊन जाते. त्वचेमधील उष्णता कमी करण्यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात गुलाब पाणी टाकून मिक्स करा. त्यानंतर चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 5 किंवा 10 मिनिटं ठेवल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.