तेलकट त्वचेसाठी घरगुती उपाय
सतत वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा इतर वेळी त्वचा अधिक तेलकट आणि चिकट होऊन जाते. चेहरा चिकट किंवा तेलकट झाल्यानंतर त्वचेवर मेकअप पूर्णपणे निघून येतो. अशावेळी त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावे. उन्हाळ्यात तेलकट त्वचा असलेल्या महिलांचा चेहरा अधिक खराब आणि निस्तेज होऊन जातो. त्वचा तेलकट आणि चिकट झाल्यानंतर योग्य वेळी स्वच्छ न केल्यास पिंपल्स किंवा मुरूम येण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
औषधी गुणधर्मांनी युक्त या हिरव्या ज्यूसचे करा सेवन; आठवड्याभरातच अतिरिक्त चरबी जाईल वितळून
तेलकट त्वचेवर आलेले मुरूम आणि पिंपल्स लवकर कमी होत नाही. जास्त घाम आल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. पिंपल्स आणि मुरुमानी भरलेली त्वचा पुन्हा सुधारण्यासाठी घरगुती उपाय करून त्वचा सुधारावी. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात तेलकट झालेली त्वचा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
मागील अनेक वर्षांपासून चेहरा आणि केसांसाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कोरफड जेल त्वचेवर लावल्यानंतर चेहरा हायड्रेट आणि थंड राहतो. त्वचेमधील उष्णता कमी करून चेहऱ्यामधील ओलावा कायम टिकून राहतो. कोरफड जेलमध्ये असलेले अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म त्वचेवर अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी मदत करते. याशिवाय चेहऱ्यावर आलेले ऍक्ने कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यासाठी कोरफड हलकेसे गरम करून त्यातील गर काढून घ्या. त्यानंतर कोरफडचा गर संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर साचून राहिलेले अतिरिक्त तेल कमी होते. कोरफड जेल त्वचेमधील छिद्र मोकळी करतात आणि त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यामुळे चेहऱ्यावर चिकट आणि तेलकटपणा कमी होईल.
उन्हाळ्यात बाजारामध्ये काकडी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. काकडीमध्ये असलेले पाणी शरीर सुधारण्यासाठी मदत करते. यामध्ये 92 टक्के पाणी आढळून येते, ज्यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा सुंदर दिसून लागते. त्वचेसाठी काकडी अतिशय प्रभावी आहे. काकडीचा रस त्वचेवर लावल्यास त्वचा हायड्रेट आणि फ्रेश राहते. यासाठी किसलेली ककाडी वाटीमध्ये घेऊन त्याचा रस काढून संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. यामध्ये तुम्ही लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता. काकडीचा वापर टोनर म्हणून देखील करू शकता.