Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा बीटच्या रसाचा वापर, त्वचा होईल सुंदर आणि तेजस्वी

बीटचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे चेहरा अतिशय सुंदर आणि उजळदार होतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगेवेगळ्या क्रीम्स लावतात. मात्र असे न करता बीटचा वापर त्वचेसाठी करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 05, 2025 | 09:54 AM
चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी 'या' पद्धतीने करा बीटच्या रसाचा वापर

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी 'या' पद्धतीने करा बीटच्या रसाचा वापर

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्वचेचा पोत खराब झाल्यानंतर तो सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. याशिवाय अनेक महिला सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी सतत काहींना काही करतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट केल्या जातात. हे उपाय केल्यानंतर काहीकाळ त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसू लागते. मात्र कालांतराने त्वचेमध्ये अनेक बदल होऊ लागतात. त्वचेला सूट न होणाऱ्या ट्रीटमेंट केल्यामुळे काहीवेळा इन्फेक्शन किंवा ऍलर्जी होण्याची शक्यता असते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.(फोटो सौजन्य – iStock)

अंघोळीसाठी साबण वापरत असाल तर थांबा! ‘या’ घरगुती पदार्थांचा वापर करून शरीर करा स्वच्छ, दुर्गंधी होईल कायमची गायब

वय वाढल्यानंतर काहीवेळा त्वचेवर सुरकुत्या येणे, पिंपल्स येणे, फोड इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बीटचे नियमित सेवन करावे. बीट खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय रोजच्या आहारात बीट किंवा बीटच्या रसाचे सेवन करू शकता. यामध्ये 87 टक्के पाणी असते. याशिवाय ए, बी आणि सी, लोह, मँग्नेशिअम, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेवर चमकदार ग्लो येतो.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा काळवंडून जाते. काळी आणि कोरडी झालेली त्वचा उजळ्वण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.बीटचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल. त्वचा स्वच्छ करण्यासाठी अनेक महिला सनस्क्रिन, क्लींजिंग करताना केमिकल प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र असे न करता घरगुती उपाय करून त्वचा स्वच्छ करावी.

क्लींजिंग:

उन्हामुळे टॅन झालेली त्वचा सुधारण्यासाठी बीटच्या रसात कच्चे दूध घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे चेहरा आतून स्वच्छ होण्यास मदत होईल. हा उपाय नियमित केल्यास त्वचा स्वच्छ होऊन सुंदर दिसू लागेल.

पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल करण्यापेक्षा घरीच तयार करा गोल्डन क्रीम, त्वचेवर येईल सोन्यासारखी चमक

फेस स्क्रब:

त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी त्वचा स्क्रब करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवरील घाण देखील स्वच्छ होते आणि त्वचा उजळदार होते. यासाठी बीटच्या रसात साखर मिक्स करून त्वचेवर लावा. त्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर होईल . याशिवाय त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी निघून जातील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Use beetroot juice in this way to get a natural glow on your face your skin will become beautiful and radiant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 09:54 AM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन
1

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ
2

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

वर्षानुवर्षे वापरलेली उशी धुळीने झालीये काळी-पिवळी? पाण्याचा एक थेंबही न वापरता करा स्वछ; ही भन्नाट ट्रिक आहे कामाची
3

वर्षानुवर्षे वापरलेली उशी धुळीने झालीये काळी-पिवळी? पाण्याचा एक थेंबही न वापरता करा स्वछ; ही भन्नाट ट्रिक आहे कामाची

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय
4

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.