
Summer Special Fabric : उन्हापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी 'अशा' कपड्यांचा वापर करा, त्वचेचे विकार होतील दूर
Summer Special Fabric: उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे त्वचा काळवंडणे आणि कोरडी तसंच लाल होण्याची समस्या जाणवते. गरमीच्या दिवसात सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसातून तीन ते चार लीटर पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. त्वचेचं संरक्षण होण्यासाठी जसा आहार महत्त्वाचा आहे तसंच तुमची लाईफस्टाईल देखील महत्त्वाची आहे. जसं उन्हापासून बचाव करण्यासाठी आपण सनस्क्रीन आणि गॉगल वापरतो तसंच उन्हातून बाहेर जाताना वापरत असलेले कपडे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.
जसं हिवाळ्यात थंडीपासून बचावासाठी आपण स्वेटर आणि जाड कपडे वापरतो तसंच उन्हाळ्यात देखील सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव करण्यासाठी देखील योग्य कपडे वापरले पाहिजेत. गरमीच्या दिवसात शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम बाहेर पडत असतो. या घामाचा योग्य रितीने निचरा झाला नाही की, बऱ्याच जणांना त्वचाविकार होत असतात. त्यामुळे उन्हाळ्यात कपडे देखील योग्य प्रकारे वापरले पाहिजेत असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
सूती (कॉटर्नचे ) कपडे – उन्हाळ्यात सूती कपडे वापरणं फायद्याचं ठरतं. सतत येेणारा घाम कॉटनचे कपडे शोषून घेतात. कॉटर्नच्या कपड्यांमुळे अतिरिक्त घाम येत नाही. सुती कपड्यांमुळे शरीरातील घाम त्वचेवर फार काळ राहत नाही. त्यामुळे सतत खाज येणं, किंवा घामामुळे होणारे त्वचाविकार सुती कपड्यांमुळे होत नाही. त्याचबोरबर सुती कपड्यांच्या वापराने गरमीचा त्रास फार होत नाही.
उन्हाळ्यात हलक्या म्हणजेच फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. मार्च ते मे या कालावधीत सूर्याचं तापमान वाढलेलं असतं. अशा दिवसात काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे सूर्याची कीरणं शोषून घेतात त्यामुळे खूप जास्त गरमीचा त्रास जाणवायला लागतो. या दिवसातून बाहेर जाताना पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. पांढरा रंग हा सूर्याची किरणं परावर्तीत करतो. पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमुळे उन्हाळ्या झळा थेट त्वचेला त्रास देत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेेर जाताना पांढऱ्या रंगाचे कपडे आणि तोंडाला सुती आणि पांढऱ्या रंगाचा स्कार्फ बांधल्याने त्वाचेचं नुकसान फार होत नाही.
खास खादीच्या कपड्यांना भारताच्या विविध राज्यांप्रमाणेच परदेशातही मोठी मागणी आहे. पारंपरिक पद्धतीने तयार केलेले खादीचे कपडे उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण करतात. सध्या नवनवीन ट्रेंड्स येत आहे. त्यामुळे तुम्ही खास उन्हाळ्यासाठी खादीचे कुर्ती, टॉप असं वेअर करु शकता. खादीच्या कपड्यांमुळे शरीरात तापमान नियंत्रणात रााहण्यास मदत होते.