काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी रात्री झोपताना चेहऱ्यावर लावा 'हे' फेसपॅक
उन्हाळ्यात कडक उन्हामुळे त्वचा पूणर्पणे काळवंडून जाते. त्वचा काळी झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. काळवंडलेली त्वचा पुन्हा सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे फेशिअल किंवा इतर ट्रीटमेंट करून घेतात. मात्र या ट्रीटमेंटचा अधिक काळ त्वचेवर परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा. उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णतेमुळे त्वचेवर घाम तसाच साचून राहतो, ज्यामुळे पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात. पिंपल्स आल्यानंतर त्वचा अजूनच खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
आता Measles चा भयानक कहर, 124 लोकांना बाधा; काय आहे मिसिल्स आजार, कसा करावा उपाय
त्वचेवर सूर्याची किरण पडल्यामुळे त्वचा काळी दिसू लागते. त्यामुळे या दिवसांमध्ये बाहेर फिरायला जाताना किंवा कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्वचेवर स्क्रफ बांधावे, याशिवाय सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून सनस्क्रीनचा वापर करावा. उन्हाळ्यामुळे त्वचेवर मुरूम, खाज घेणे, त्वचा तेलकट किंवा चिकट होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती फेसपॅकचा वापर कशाप्रकारे करावा आणि फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.
जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी बेसनचा वापर केला जातो. याशिवाय त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बेसन वापरले जाते. बेसन त्वचेवरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. तसेच या मास्कचा वापर केल्यामुळे त्वचेवरील मृत पेशी कमी होऊन त्वचा उजळदार आणि सुंदर दिसू लागते. बेसन मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात दही मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात थोडस गुलाब पाणी टाकून मिक्स करा. तयार केलेला मास्क त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या.
40 वर्षानंतरही दिसाल 20 वर्षासारखे तरूण, 5 कोरियन टी तुमची त्वचा ठेवतील चमकदार आणि Glowing
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बेसन अतिशय प्रभावी ठरते. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करावा. यामुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचा बचाव होतो. काळवंडली त्वचा उजळदार आणि सुंदर दिसू लागते. घरगुती उपाय त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरतात. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचेवरील समस्या कमी करून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी आहेत.