जास्वंदीचे तेल बनवण्याची कृती
थंडीच्या दिवसांमध्ये केस गळणे ही सामान्य समस्या आहे. महिलांसह पुरुषांचे सुद्धा या दिवसांमध्ये केस गळतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू केस संपूर्ण घरभर दिसू लागतात. सर्वच महिला आणि पुरुष केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये केसांची गुणवत्ता खराब होऊ लागते. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, सतत खाज येणे, केस पांढरे होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट किंवा केमिकल युक्त शॅम्पूचा वापर करतात. या सर्व गोष्टी केल्यानंतर काहीकाळ केस सुंदर आणि चमकदार दिसतात. मात्र कालांतराने केस पुन्हा एकदा होते तसेच होऊन जातात.(फोटो सौजन्य-istock)
हेअर केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावे. हे उपाय केल्यामुळे केस नैसर्गिकरित्या मजबूत आणि सुंदर होतात. शिवाय केसांची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी जास्वंदीच्या फुलाचा वापर कसा करायचा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जास्वंदीच्या फुलांमध्ये असलेले गुणधर्म केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी आहेत. यामुळे केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळतो.
केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचे पाणी वापरा. यासाठी गरम पाण्यात जास्वंदीची फुले टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर त्या पाण्याने केस स्वच्छ धुवा. यामुळे केस गळती थांबेल आणि केसांना अनेक फायदे होतील. यामुळे टाळूवरील इन्फेक्शनचा धोका कमी होईल आणि टाळू स्वच्छ राहण्यास मदत होईल. जास्वंदीची फुले टाळू निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. शिवाय केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी आहेत.
हेअर केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
केमिकल युक्त शॅम्पू वापरण्यापेक्षा घरी बनवलेला शँम्पू वापरावा. यामुळे केसांना कोणतीही हानी पोहचत नाही. जास्वंदीच्या पानांचा शॅम्पू बनवण्यासाठी दीड कप पाण्यात बारीक केलेली जास्वंदीची पाने टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर त्यात बेसन आणि शॅम्पू टाकून मिक्स करा. तयार केलेला शॅम्पू थंड झाल्यानंतर केसांना लावून केस पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे केसांची वाढ चांगली होईल.