Natural Scrub: वायू प्रदूषणामुळे आपल्या त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्वचेवर धूळ साचून मुरुम, पुरळ यासारख्या त्वचेच्या समस्या निर्माण होतात. काही लोकांची त्वचा इतकी संवेदनशील असते की त्यांना उन्हाळा आणि हिवाळ्यात अशा समस्यांना सामोरे जावे लागते. फेशियल आणि चेहऱ्यावर क्लीनअप यांसारखे महागडे उपचार करून लोक पैसे वाया घालवतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुमच्या किचनमध्ये असल्या सामानासोबत तुमच्या चमकदार चेहऱ्यासाठी वापरता येईल. ब्युटिशियन स्मिता कांबळे यांनी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा (फोटो सौजन्य - iStock)
त्वचेचे एक्सफोलिएशन अत्यंत गरजेचे आहे. त्वचा नियमित मऊ मुलायम राहवी आणि चमकदार रहावी यासाठी तुम्ही घरीही त्वचेचे एक्सफोलिएशन करू शकता. यासाठी नैसर्गिक स्क्रब म्हणून किचनमधील काही वस्तूंचा कसा वापर करावा जाणून घ्या
ऑर्गेनिक मसूर डाळीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्याची पेस्ट बनवण्यापूर्वी मसूर मऊ करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. नंतर ते बारीक करून पेस्ट बनवा, दुधात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा आणि 5 ते 10 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा
हे स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये साखर मिसळावी लागेल. ऑलिव्ह ऑइलचा तुमच्या चेहऱ्यावर खूप चांगला परिणाम होईल कारण त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. दुसरीकडे, साखरेने मसाज केल्याने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याची चमक वाढते आणि अधिक सुंदर दिसता
ओट्स बारीक करून पीठ बनवा. एक्सफोलिएशन प्रक्रियेसाठी हे फायदेशीर आहे. त्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. मुरुम आणि दाहक त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी ओट्स चांगले मानले जातात. मध आणि पाण्यात बारीक ओट्स मिक्स करा आणि तुमचा चेहरा स्क्रब करा किंवा तुम्ही खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाच्या तेलाने तुमचे शरीर स्क्रब करू शकता
लिंबूवर्गीय आणि गोड फळे व्हिटॅमिन सी युक्त असतात. यातील अँटिऑक्सिडेंट जो कोलेजनचे उत्पादन करण्यास मदत करते, वृद्धत्व रोखते आणि नवीन त्वचेच्या निर्मितीस प्रोत्साहन देते. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी संत्र्याची साल काही दिवस उन्हात वाळवा. नंतर ते बारीक करून पावडर बनवा. या पावडरमध्ये हळद आणि मध मिसळून एक पेस्ट तयार करा आणि नंतर पेस्ट चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटे पूर्णपणे मसाज करा
बेसन आणि हळद स्क्रब डेड स्किनपासून मुक्त होण्यासाठी बेसनाचा वापर केला जातो. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे रासायनिक संयुग असते, जे अँटिऑक्सिडंट, वृद्धत्वविरोधी आणि कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. जर गुलाबपाणी किंवा लिंबाचा रस बेसन आणि हळदीच्या पेस्टमध्ये मिसळले तर ते त्वचेची काळजी घेण्याचे एक चांगले उपाय ठरू शकते जे तुमच्या त्वचेला चमक देण्यास मदत करेल