Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वातावरणातील बदलांमुळे केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने घ्या कोरड्या केसांची काळजी, महिनाभरात होतील चमकदार

थंडीत केस खूप जास्त कोरडे होतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला महागड्या हेअर सीरम आणि हेअर केअरचा वापर करतात. पण याऐवजी केसांची योग्य काळजी घेतल्यास केस सुंदर आणि मजबूत होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 07, 2026 | 02:40 PM
वातावरणातील बदलांमुळे केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत? 'या' पद्धतीने घ्या कोरड्या केसांची काळजी

वातावरणातील बदलांमुळे केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत? 'या' पद्धतीने घ्या कोरड्या केसांची काळजी

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. या दिवसांमध्ये शरीरसोबतच त्वचा आणि केसांची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. थंडीत केसांच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. केस कोरडे पडणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे आणि केसांना व्यवस्थित पोषण न मिळाल्यामुळे केस पांढरे सुद्धा होतात. केस कोरडे झाल्यानंतर ते पुन्हा नव्याने चमकदार आणि सुंदर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या आणि परदेशी ब्रँडच्या हेअर केअर प्रॉडक्टचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण यामुळे काही काळापुरते केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. पण कालांतराने पुन्हा एकदा केसांच्या समस्या उद्भवून केसांना हानी पोहचते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता या टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

केसांना जपण्यासाठी आधी केसांखालची त्वचा जपा! टिप्स फॉलो करा आणि डोक्यावर चंद्र होण्यापासून स्वतःला वाचवा

थंड हवामानामुळे आपल्या केसांमधील ओलावा कमी होऊ लागतो. परिणामी केसांमध्ये कोंडा होणे, केस दुभंगणे आणि केस कोरडे होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. यासाठी बदलत्या हवामानानुसार आपल्या केसांची योग्य ती देखभाल करणं आवश्यक आहे. कोरडेपणामुळे केसांचे अधिक नुकसान होते. केसगळती, कोंडा होणे, टाळूला खाज सुटणे इत्यादी समस्या निर्माण होतात. पण वेळीच यावर उपाय करणं गरजेचं आहे. अन्यथा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. हिवाळ्यामध्ये केसांची कशी काळजी घ्यावी, जाणून घेऊया.

हीट आणि स्टाइलिंग टुल्सचा वापर करू नये:

हीट आणि हेअर स्टाइलिंग टुलचा नियमित वापर करणं टाळावं. अन्यथा केसांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. मुख्यतः थंड वातावरणात केसांचे नुकसान अधिक होतं. हिवाळ्यात स्टाइलिंग टुलचा अति वापर केल्याने केसांच्या मुळांवर वाईट परिणाम होतो. जे केसांचे आरोग्यासाठी हानिकारक असते.

वेळच्या वेळी केस कापणे:

ठराविक दिवसांच्या अंतरानंतर केस कापणं अतिशय आवश्यक आहे. जेणेकरून दुभंगलेल्या केसांची समस्या निर्माण होणार नाहीत. वेळच्या वेळी केस कापणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हेअर केअर रुटीनमधील हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

केसांना लावा सीरम:

केवळ थंडीच्या दिवसांतच नव्हे तर नियमित स्वरुपात केसांना सीरम लावावे. सीरमच्या वापरामुळे केस कोरडे होत नाहीत. केसांमधील ओलावा टिकून राहतो. ज्यामुळे केस मऊ आणि सुंदर राहण्यास मदत मिळते. दुभंगलेल्या केसांच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन सीरमचा वापर करावा.

कोंड्यामुळे सतत केस गळतात? तमालपत्राचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर सीरम, केसांची होईल झपाट्याने वाढ

कंडिशनर लावणं गरजेचं :

हिवाळ्यामध्ये टाळूच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी होऊ लागते. यामुळे टाळूची त्वचा कोरडी होऊ लागते. टाळूची त्वचा निरोगी असेल तर केसांशी संबंधित समस्या उद्भवत नाही, ही बाब लक्षात ठेवा. कोरड्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी टाळू हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. केमिकल फ्री शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा. केसांच्या मुळांना कंडिशनर लावण्याची चूक कधीही करू नका.

केसांना तेलाने मसाज करावा:

एक आवश्यक हेअर केअर रुटीन आहे. नियमित स्वरुपात केसांना तेल लावून हलक्या हातानं मसाज करावा. सध्या बाजारामध्ये आपल्या केसांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रकारचे तेल उपलब्ध आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Have your hair become dry and brittle like a broom due to environmental changes take care of your dry hair in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • hair care tips
  • hair fall reason
  • Winter Care

संबंधित बातम्या

केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती वाटते? मग मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, महिनाभरात होतील लांबलचक केस
1

केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती वाटते? मग मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, महिनाभरात होतील लांबलचक केस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.