चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा परत मिळवण्यासाठी मिठाच्या पाण्याचा 'या' पद्धतीने करा वापर
जेवणातील अतिशय महत्वाचा पदार्थ म्हणजे मीठ. आहारातील सर्वच पदार्थ बनवताना मिठाचा वापर केला जातो. जेवणात मीठ टाकल्यानंतर पदार्थाची चव वाढते आणि बेचव जेवण चविष्ट लागते. मीठ खाणे आरोग्यासाठी जितके चांगले आहे, तितकेच मीठ खाल्यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात नेहमीच कमीत कमी प्रमाणात मीठ खावे. मिठाचे जसे आरोग्याला फायदे होतात तसेच फायदे त्वचेला सुद्धा होतात. सुंदर त्वचेसाठी सर्वच महिला पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतात. या स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचा काहीकाळ अतिशय सुंदर आणि चमकदार दिसू लागते. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी मिठाच्या पाण्याने त्वचा स्वच्छ करावी.(फोटो सौजन्य – istock)
Uric Acid वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, दुर्लक्ष केल्यास उद्भवेल संधिवाताची समस्या
स्किन केअर रुटीन फॉलो करताना मिठाच्या पाण्याने त्वचा स्वच्छ केल्यास चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, मुरूम आणि इतर समस्या दूर होण्यास मदत होईल. मीठ त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. मिठात असलेले गुणधर्म त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी मदत करतात. मिठामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि डीटॉक्सिफायिंग गुणधर्म धूळ, तेलकटपणा, मुरुमांचे जंतू कमी करून त्वचा उजळदार करतात. त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मिठाचे पाणी वापरावे. त्वचेची गुणवत्ता आणि पोत सुधारण्यासाठी मिठाचे पाणी प्रभावी ठरते. चेहऱ्यावर दिसून येणारे अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी महिला थ्रेडींग, वॅक्सिंग इत्यादी अनेक गोष्टी करतात. मात्र हे केस काढण्यासाठी तुम्ही मिठाच्या पाण्याचा वापर करू शकता. जाणून घ्या मिठाच्या पाण्याने त्वचा स्वच्छ करण्याचे फायदे.
त्वचा स्वच्छ करण्यासाठी पिंक सॉल्ट म्हणजेच सैंधव मिठाचा किंवा पांढऱ्या मिठाचा वापर तुम्ही करू शकता. त्वचा स्वच्छ करण्याच्या पाण्यात एक चमचा मीठ टाकून चेहरा व्यवस्थित धुतल्यास त्वचेतील अशुद्धता दूर होते आणि त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. त्वचेची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी मिठाचे पाणी अतिशय प्रभावी ठरते.
मोठ्या भांड्यात चमचाभर मीठ टाकून मिक्स करा. तयार केलेले पाणी व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावर थेट ओतून त्वचा स्वच्छ करा. यामुळे पिंपल्स, मुरूम, काळे डाग किंवा त्वचेच्या सर्वच समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होईल. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी मिठाच्या पाण्याचा वापर करावा.