तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी 'या' फेसपॅकचा करा वापर
कामाच्या धावपळीमध्ये महिला चेहऱ्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेकडे सुद्धा दुर्लक्ष होते. याशिवाय धूळ, माती, प्रदूषण आणि चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे काहीवेळा त्वचा काळवंडल्यासारखी वाटू लागते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे कायमच शरीरावरील त्वचेची काळजी घ्यावी. त्वचेकडे दुर्लक्ष केल्यामुळे पिगमेंटेशन, टॅनिंग, डेड स्किन आणि चेहऱ्यावर बारीक बारीक सुरकुत्या आणि रेषा दिसू लागतात. तरुण वयातच चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे फेशिअल आणि स्किन ट्रीटमेंट केल्या जातात.(फोटो सौजन्य – istock)
टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी ‘या’ पाण्याचा करा वापर, नैसर्गिक चमक वाढून केस होतील सुंदर
त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे स्किन केअर, लोशन किंवा इतर स्किन ब्राइटनिंग क्रीमचा वापर करतात. यामुळे फारकाळ चेहऱ्यावर सौंदर्य टिकून राहत नाही. याउलट त्वचा आणखीनच निस्तेज आणि कोरडी होते. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला बोटॉक्स ट्रीटमेंट करून घेतात. मात्र हे उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचा चमकदार आणि सुंदर करावी. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये केळी फेसपॅक बनवण्याची कृती सांगणार आहोत. हा फेसपॅक चेहऱ्यावर बोटॉक्सप्रमाणे काम करेल आणि सुरकुत्या, बारीक रेषा कमी होतील.
फेसपॅक बनवण्यासाठी पिकलेल्या केळ्यांचा वापर करावा. केळीमध्ये विटामिन सी, ॲण्टीऑक्सिडंट्स, पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. हा पदार्थ त्वचेवर नैसर्गिक बोटॉक्सप्रमाणे काम करते. फेसपॅक बनवण्यासाठी पिकलेलं केळ वाटीमध्ये घेऊन मॅश करा. त्यानंतर त्यात दही टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात मध घालून फेसपॅक मिक्स करून घ्या. सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चेहऱ्यावर फेसपॅक लावून काहीवेळ तसाच ठेवा. १५ ते २० मिनिटं झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतील. हा उपाय आठवड्यातून तीनदा केल्यास चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन आणि त्वचेच्या इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळेल.
सकाळी उठल्यानंतर नियमित एक किंवा दोन केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. केळी खाल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. याशिवाय त्वचेलासुद्धा अनेक फायदे होतात. त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर केळी फेसपॅकचा वापर करावा.त्वचेचा काळवंडलेला रंग सुधरण्यासाठी मधाचा वापर करावा. याशिवाय दह्यात लॅक्टीक ॲसिड आणि काही हेल्दी फॅट्स आढळून येतात, त्यामुळे त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन आणि टॅनिंग कमी होते.