टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी 'या' पाण्याचा करा वापर
हल्ली महिलांसह पुरुषांमध्ये केसांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये कोंडा होणे, टाळूवरील इन्फेक्शन इत्यादी समस्या वाढू लागल्या आहेत. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला सुरुवातीला दुर्लक्ष करतात, पण असे न करता केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेले शॅम्पू, हेअर केअर प्रॉडक्ट, हेअर सीरम, लोशन इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. पण तरीसुद्धा केस चमकदार दिसतात. केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे बाजारातील महागड्या उत्पादनांचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून केसांची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला केसांच्या निरोगी वाढीसाठी चहाचे पाणी का गुणकारी मानले जाते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा पिण्याची सवय असते. चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक रंगद्रव्ये केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत संपूर्ण केसांना पोषण देतात. त्यामुळे केस गळती किंवा केसांच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चहाच्या पाण्याचा वापर करावा. चहाच्या पाण्यामुळे केस मजबूत होतात आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर इतर कोणतेही उपाय करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून संपूर्ण केसांवर स्प्रे करावा. यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस मजबूत होतात.
चहाचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात एक चमचा चहा पावडर टाकून उकळवून घ्या. ७ ते ८ मिनिटं पाण्याला उकळी आल्यानंतर पाण्याचा रंग पूर्णपणे बदलून जाईल. तयार केलेले पाणी थंड करण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. तयार केलेला हेअर स्प्रे रात्री झोपण्याआधी नियमित केसांवर स्प्रे केल्यास केसांच्या सर्व समस्यांपासून आराम मिळेल. नैसर्गिक पाणी केसांना पोषण देते.चहाचे पाणी केसांवर लावण्याआधी केस विंचरून घ्यावे. त्यानंतर स्प्रे बॉटलच्या मदतीने केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत सगळीकडे स्प्रे करा. यामुळे केस अतिशय सुंदर आणि चमकदार होतील. चहाचा स्प्रे केसांवर मारल्यानंतर अर्धा तास केस तसेच ठेवून नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या.
चहामध्ये टॅनिन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. यामध्ये असलेले घटक केसांच्या क्यूटिकल्सना मजबूत करण्यास मदत करतात. चहामध्ये असलेले कॅफिन केसांच्या मुळांना उत्तेजित करते, ज्यामुळे केसांच्या रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. टाळूवर वाढलेला कोंडा, खाज आणि इन्फेक्शन कमी करण्यासाठी चहाच्या पाण्याचा वापर करावा.