पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती पद्धतीने बनवलेल्या 'या' हेअरमास्कचा करा वापर
वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांचे सुद्धा केस मोठ्या प्रमाणावर पांढरे होतात. केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी अनेक वेगवेगळे हेअर मास्क, हेअर कलर, हेअर डाय इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. पण तरीसुद्धा केस पांढरेच दिसतात. याशिवाय अकाली केस पांढरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वयाच्या २० शीमध्ये केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा किंवा हेअर डायचा वापर केला जातो. पण यामध्ये असलेल्या हानिकारक केमिकलमुळे केस अतिशय कोरडे होऊन जातात. केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो.(फोटो सौजन्य – istock)
वातावरणात होणारे बदल, अनुवंशिकता किंवा आहारात होणाऱ्या बदलांमुळे कमी वयातच केस पांढरे होऊन जातात. केस कोरडे होणे, केस तुटणे, नैसर्गिक चमक कमी होणे, कोंडा इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. पण केसांच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष केल्यास केस आणखीनच खराब होऊन जातात. बाजारात मिळणारे आर्टीफिशियल हेअर डाय काही वेळापुरते केस अतिशय आकर्षित करतात. पण कालांतराने केस अतिशय कोरडे होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी कोरफडपासून हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा हेअर मास्क केसांची नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवतो.
मागील अनेक वर्षांपासून त्वचा आणि केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडचा वापर केला जातो. कोरफडमध्ये असलेले पाणी त्वचा आणि केसांमधील नैसर्गिक चमक कमी टिकवून ठेवण्यास मदत करतो. याशिवाय कोरफडचा वापर केल्यामुळे केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते. हेअरमास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात कलोंजी, कॉफी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या. कोरफड जेलमध्ये तयार केलेले पाणी गाळून घ्या आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करा.
तयार केलेला हेअरमास्क केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या. ३० ते ४० मिनिटं हेअरमास्क केसांवर तसाच ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे तुमचे पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होईल. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी.