गणपती बाप्पाच्या पूजेचे साहित्य उरले आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा आयुर्वेदिक क्रीम
संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये मोठा आनंद आणि उत्साह असतो. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या जलौषात तयारी केली जाते. याशिवाय बाप्पाचे स्वागत झाल्यानंतर घरात मनोभावे पूजा करून ११ व्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो. बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य विकत आणेल जाते. धूप अगरबत्ती, कपूर, धूप, फुले इत्यादी अनेक वेगवेगळे सामान आणले जाते. पूजेच्या ताटात प्रामुख्याने वापरला जाणारे साहित्य म्हणजे तेल आणि कापूर. बाप्पाच्या आरतीसाठी कापूर पेटवले जाते. पण पूजेच्या साहित्यामधील कापूर आणि तेल शिल्लक राहिल्यानंतर नेमकं काय करावे असा प्रश्न सगळ्यांचं कायमच पडतो.(फोटो सौजन्य: Pinterest)
पुरेजसाठी वापरला जाणारा कापूर त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरतो. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग घालण्यासाठी मदत करतात. यासोबतच तेलाचा सुद्धा वापर त्वचेसाठी केला जातो. आज आम्ही तुम्हाला गणपती बाप्पाच्या पूजेतील शिल्लक राहिलेल्या तेल आणि कापूरपासून आयुर्वेदिक क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कापूरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी होऊन त्वचा अधिक उजळदार आणि सुंदर होते. घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेली क्रीम त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार करण्यासाठी मदत करते. याशिवाय चेहऱ्यावर आलेले मोठे मोठे पिंपल्स घालवण्यासाठी कापूरचा वापर करावा.
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या कापूरपासून क्रीम बनवण्यासाठी तेल, कापूर, बदाम तेल, खोबरेल तेल, कोरफड जेल, ग्लिसरीन, हळद, चंदन पावडर, गुलाबपाणी एवढ्या पदार्थांची आवश्यकता लागणार आहे. हे पदार्थ बाजारात सहज उपलब्ध होतात. आयुर्वेदिक पदार्थांपासून बनवलेली क्रीम त्वचेवर नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवते. हे सर्व साहित्य घरात सहज उपलब्ध होते.
क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, कापूरची बारीक पावडर तयार करून घ्या. तयार केलेल्या पावडरमध्ये खोबऱ्याचे तेल, बदाम तेल टाकून मिक्स करा. त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणात कोरफड जेल, ग्लिसरीन, हळद, चंदन पावडर, गुलाबपाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर काचेच्या बंद डब्यात भरून ठेवा. तयार केलेली क्रीम रात्री झोपताना नियमित चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर जमा झालेली डेड स्किन कमी होईल आणि चेहरा उजळदार दिसेल.
बदलत्या हवामानातही ओठांचे सौंदर्य आणि निरोगीपणा टिकवण्याचे सोपे घरगुती उपाय
सुंदर दिसण्यासाठी महिला बाजारातील अनेक वेगवेगळ्या क्रीमचा वापर करतात. पण केमिकलयुक्त क्रीम वापरण्याऐवजी आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या क्रीमचा वापर करावा. डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी कापूरच्या क्रीमचा वापर करावा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी कापूर अतिशय प्रभावी ठरेल.