डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' पदार्थाचा करा वापर
हल्ली महिला आणि पुरुषांमध्ये त्वचेसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. त्वचेवर पिंपल्स, मुरूम, फोड, वांग, पिगमेंटेशन इत्यादी अनेक समस्या वाढू लागल्यानंतर त्वचा अतिशय निस्तेज आणि रुक्ष दिसू लागतात. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे त्वचेच्या समस्या आणखीनच वाढून त्वचा खराब होऊन जाते. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल आणि अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ वाढू लागतात. डोळे काळे झाल्यानंतर महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. कधी स्किन केअर प्रॉडक्ट वापरले जातात तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम लावल्या जातात. पण तरीसुद्धा डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग लवकर निघून जात नाहीत.(फोटो सौजन्य – istock)
मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे डोळ्यांवर तणाव येतो. डोळ्यांवर तणाव आल्यानंतर डोळ्यांखाली असलेल्या अतिशय नाजूक आणि संवेदनशील त्वचेला हानी पोहचते. तसेच त्वचेचा रंग हळूहळू खराब होऊन जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली वाढलेली काळी वर्तुळ कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थाचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थाच्या वापरामुळे डेड स्किन कमी होते आणि त्वचा उजळदार, सुंदर दिसते. डोळ्यांखाली आलेल्या सुरकुत्या आणि काळे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावे.
डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात कोरफड जेल टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण त्वचेवर किंवा डोळ्यांभोवती वाढलेल्या काळेपणावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर १० ते १५ मिनिटांनी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग, मृत पेशी आणि पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होईल. आठवडाभर नियमित कॉफी मास्क त्वचेवर लावल्यामुळे त्वचा अतिशय सुंदर दिसते.
वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात अर्धा चमचा ग्लिसरीन आणि बदामाचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण त्वचेवर लावून घ्या. १० मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा फेसपॅक लावल्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स कमी होण्यास मदत होते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर फेसपॅक तयार करताना गुलाब पाण्याचा वापर करावा.