कोरियन महिलांप्रमाणे सिल्की केस हवे आहेत? मग 'या' पद्धतीने करा तांदळाच्या पाण्याचा वापर
हल्ली धूळ, माती, प्रदूषणामुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. केस गळणे, केसांमध्ये कोंडा वाढणे, केस अचानक तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. बऱ्याचदा केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे केसांच्या समस्या आणखीनच वाढत जातात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर, गोळ्या औषध, महागड्या ट्रीटमेंट, वेगवेगळे शॅम्पू इत्यादी अनेक गोष्टींचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा केसांच्या समस्या कमी होतात. सोशल मीडियावर मागील अनेक काही दिवसांपासून कोरियन प्रॉडक्टची मोठी क्रेझ वाढली आहे.(फोटो सौजन्य – istock)
सामान्य वाटणारी ‘ही’ गोष्ट आहे स्कीन कॅन्सरच्या सुरुवातीचं लक्षण, दुर्लक्ष केल्यास पडेल महागात
कोरियन स्किन केअर, कोरियन हेअर केअर प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध झाले आहेत. कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि सिल्की केस मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. वेगवेगळे उपाय करण्याऐवजी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. तांदळाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केल्या केस अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतील. तांदळाचे पाणी केसांसाठी नॅचरल क्लिंझर म्हणून सुद्धा वापरले जाते. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी तांदळाच्या पाण्याचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
तांदळाचे पाणी केसांवर लावताना महिला अनेक चुका करतात. या चुकांमुळे केस चांगले होण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जातात. केसांच्या मुळांना हानी पोहचते. वारंवार तांदळाचे पाणी केसांवर लावल्यामुळे टाळूवर खाज सुटण्याची शक्यता असते. टाळूवर सतत येणाऱ्या खाजेमुळे इन्फेक्शनचा धोका वाढू लागतो. त्यामुळे कोणतेही घरगुती उपाय करताना चुकीच्या पद्धतींचा वापर करू नये. तांदळाच्या पाण्यात इनोसिटॉल, अमीनो ऍसिड आणि इतर जीवनसत्वे आढळून येतात. ज्यामुळे कोरडे आणि रुक्ष झालेले केस मऊ होण्यास मदत होते.
केसांमध्ये वाढलेले कोंडा कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. याशिवाय टाळूवर वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी प्रभावी ठरते. तांदळाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.केसांची खुंटलेली वाढ होऊन केस मजबूत आणि चमकदार दिसू लागतील.
तांदळाचे पाणी तयार करताना अर्धा वाटी तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मोठ्या भांड्यात पाणी आणि तांदूळ भिजत ठेवा. रात्रभर तांदूळ पाण्यात व्यवस्थित भिजल्यानंतर सकाळी पाणी गाळून केसांवर लावा. काहीवेळ ठेवून नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल आणि केस सुंदर, चमकदार दिसू लागतील.