चेहऱ्यावर साचून राहिलेला घाणीचा काळा थर कमी करण्यासाठी 'या' आंबट पदार्थाचा करा वापर
सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी स्किन केअर प्रॉडक्टमध्ये बदल केला जातो, तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीमचा वापर केला जातो. मात्र तरीसुद्धा त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारत नाही. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे चेहऱ्यावर कोणतेही प्रयोग करून पाहू नये. वर्षाच्या बाराही महिने वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतो. या बदलांमुळे त्वचा अतिशय खराब आणि निस्तेक होऊन जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आद्र्रतेमुळे चेहरा अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जातो. त्वचा तेलकट झाल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम, ब्लॅकहेड्स येतात. घाणीचा थर चेहऱ्यावर तसाच साचून राहतो.(फोटो सौजन्य – istock)
फक्त २ साहित्यापासून घरी तयार करा नॅचरल Eye Mask; रातोरात डोळ्यांवरील काळी वर्तुळे होतील दूर
चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी महागड्या क्रीम किंवा इतर स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. स्किन केअर प्रॉडक्ट वरून त्वचा स्वच्छ करतात. मात्र चेहऱ्यावर साचलेल्या ब्लॅकहेड्स आणि मुरुमांमुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि कोरडी वाटू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी टोमॅटोचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होईल आणि टॅनिंगमुळे वाढलेली डेड स्किन स्वच्छ होऊन त्वचा उजळदार दिसू लागेल.
त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचा स्वच्छ करावी. टोमॅटोमध्ये लायकोपीन” नावाचे अँटीऑक्सिडंट आढळून येते, ज्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून चेहऱ्याचे नुकसान होत नाही. तसेच यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. नियमित टोमॅटो त्वचेवर चोळल्यास चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होऊन त्वचा स्वच्छ होईल.याशिवाय टोमॅटो हे एक नैसर्गिक सनस्क्रीन आहे.
काखेत वाढलेला काळेपणा- दुर्गंधी जाईल पळून! ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, काख होईल स्वच्छ
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढण्यास मदत होते. टोमॅटोचा रस काढून तुम्ही चेहऱ्यावर सुद्धा लावू शकता. टोमॅटो किसून त्याचा रस काढून घ्या. त्यानंतर टोमॅटोचा रस संपूर्ण मान आणि चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. नंतर हाताला थोडस पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि चेहरा उजळदार दिसू लागेल. हा उपाय आठवड्यातून नियमित किंवा दोन तीन वेळा सुद्धा तुम्ही करू शकता. त्वचेवर वाढलेला गडदपणा कमी होऊन त्वचा हळूहळू स्वच्छ होते.