दिवाळीनिमित्त फराळातील पदार्थ बनवताना साखरेऐवजी करा 'या' पदार्थाचा वापर
दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सणावाराच्या दिवसांमध्ये घरात गोडाचे पदार्थ बनवले जातात. याशिवाय दिवाळीमध्ये साफसफाई करून फराळ बनवला जातो. फराळातील सर्वच पदार्थ बनवताना सारखेच वापर केला जातो. पण अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. उत्सवाच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोड पदार्थ खाल्ले जातात. यामुळे मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवाळीला सणाला साखरेचा वापर न करता ओट्सचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये लाडू बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. ओट्स आरोग्यासाठी अतिशय हेल्दी असतात. ओट्सचे सेवन केल्यामुळे पोटसुद्धा भरलेले राहते आणि शरीरात अतिरिक्त साखरेचे प्रमाण अजिबात वाढत नाही. दिवाळीमध्ये फराळातील पदार्थ बनवताना कमीत कमी साखरेचा वापर करून पदार्थ बनवावे. चला तर जाणून घेऊया साखरेचा वापर न करता लाडू बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य: Pinterest)
शिल्लक राहिलेल्या चपातीसपासून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट लाडू, बालपणाची होईल आठवण