
कोणता हेअर कलर ठरेल अधिक आकर्षक (फोटो सौजन्य - iStock/Godrej)
व्हॅलेंटाइन डे जवळ अगदी उद्यावर येऊन ठेपलाय आणि अधिक आकर्षक दिसण्यासाठी काय करावे असा जर तुमचा विचार असेल तर तुम्ही हा लेख नक्कीच वाचायला हवा. या निमित्ताने आकर्षक हेयर कलर्स व स्टाइल्स वापरून तुम्ही तुमचा लुक आणखी रोमँटिक करू शकता. नव्या ट्रेंडी स्टाइल्समधून तुमचं खास व्यक्तिमत्त्व उठावदार करा आणि इतरांच्या हृद्याचा ठोका चुकवा. तुम्ही एखादी छानशी डेट नाइट प्लॅन करत असाल, किंवा शानदार कार्यक्रमासाठी हजेरी लावणार असाल, नाहीतर स्वतःवरचं प्रेम साजरं करणार असाल, तुमच्यासाठी काहीतरी प्रेरणादायी असं आमच्याकडे आहे.
गोदरेज प्रोफेशनलचे नॅशनल टेक्निकल प्रमुख शैले मुल्या यांनी १२ आकर्षक हेयरस्टाइल लुक्स तयार केले आहेत. हे लुक्स निसर्गापासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आले असून त्यात सरियल कलेक्शनच्या बहारदार छटांचा समावेश आहे. भारतीय सौंदर्याला पूरक ठरेल आणि तरीही जागतिक ट्रेंड्सला साजेसे असेल अशाप्रकारे तयार करण्यात आलेले हे हेयर कलर्स व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने बोल्ड स्टेटमेंट करण्यासाठी अगदी योग्य आहेत. टॉप ट्रेंडिंग कलर्स आणि हेयरस्टाइल्सची ही झलक या प्रेमाच्या या हंगामात अधिक आकर्षक आणि ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्हाला मदत करेल
टँजरिन ड्रीम हेयर कलर (कॉपर हेयर कलर)
ट्रेंडी कॉपर हेअर कलरचा वापर
व्हॅलेंटाइन डे ला नवी उर्जा हवी असणाऱ्यांसाठी टँजरिन ड्रीम अगदी योग्य आहे. अँटेलोप कॅन्यनच्या कलर पॅलेटमधील गडद रंगांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या टँजरिन ड्रीममध्ये तांबूस रंग आणि सोनेरी छटा यांचं मिश्रण करण्यात आलं आहे. हा उठावदार रंग कॅन्यनच्या रेशमी रंगाची तांबूस आणि चकाकत्या सोनेरी रंगाशी जोड घालत अविस्मरणीय लूक तयार करतो. या रंगछटा तीन अनोख्या हेयरस्टाइल्स लूक्ससह जिवंत करण्यात आल्या असून त्यातून त्यांचं वैविध्य आणि टँजरिन ड्रीम छटेचा बहारदारपणा दिसून येतो.
रोझलेट ब्लिस हेयर कलर (लाल हेयरकलर)
ट्रेंडी लाल रंगाचा हेअर कलर
रोमान्स व्यक्त करण्यासाठी लाल रंग सर्वात योग्य मानला जातो आणि रोझलेट ब्लिसमध्ये प्रेमा रोज रेड व जांभळट छटांशी मेळ घालण्यात आला आहे. सेराना डे हॉर्नकॅलच्या आकर्षक कलर पॅलेटपासून प्रेरणा घेणारा हा हेयर कलर पहाडांच्या रंगछटांची आठवण करून देणारा आहे. हा रंग अनवट सौंदर्य आणखी उठावदार करणारा आहे. हा रंग तीन खास हेयरस्टाइल लूक्ससह मांडण्यात आला व त्या प्रत्येकात या आकर्षक रंगाचं वैविध्य आणि चमक दिसून आली.
केसांचे सौंदर्य आणखीन वाढवण्यासाठी केसांना लावा काकडीपासून बनवलेले ‘हे’ हेअर मास्क
बनवा व्हॅलेंटाईन खास
व्हॅलेंटाईनच्या दिवशी आपल्या जोडीदारांना नक्की काय सरप्राईज द्यायचं हा तुमचा विचार असेल आणि तुम्हालादेखील तुमच्या लुकमध्ये काही फरक हवा असेल तर तुम्ही या टिप्स नक्कीच फॉलो करून केसांना एखादा आकर्षक आणि वेगळा रंग वा लुक देऊन त्यांची प्रतिक्रिया पाहू शकता. तुमच्या व्यक्तिमत्वातील हा बदल नक्कीच त्यांना हवाहवासा वाटेल आणि तुमचा हा प्रेमाचा दिवस अधिक खास होईल यात शंका नाही. मग वाट कसली पाहताय, काहीच तास शिल्लक आहेत. चला लागा तयारीला! बनवा आपला Valentine Day खास