काकडी हेअर मास्क
केसांची वाढ ही केसांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यामुळे जर तुमच्या केसात कोंडा,घाण,केस कोरडे होणे, केस सतत गळणे इत्यादी अनेक समस्या जाणवत असतील तर त्याचा परिणाम केसांच्या वाढीवर लगेच दिसून येतो. त्यामुळे केसांची योग्य ती निगा राखणे आवश्यक आहे. केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी केसांना योग्य ते पोषण मिळणे आवश्यक आहे. केसांना हायड्रेट ठेवणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. निरोगी केसांसाठी नेहमी 7 ते 8 लिटर पाणी प्यायले पाहिजे.
उन्हाळा किंवा इतर ऋतूंमध्ये शरीराला थंड ठेवण्याचे काम काकडी करते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीर थंड राहते. काकडीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरासोबत केसांना देखील त्याचे फायदे होतात. टाळूवरील कोंडा, कोरडे केस, सतत टाळूला खाज येणे इत्यादी सर्व समस्या कमी होऊन केसांची वाढ होते. आज आम्ही तुम्हाला केसांच्या मजबूत वाढीसाठी आणि केस गळती होऊ नये, यासाठी काकडीपासून हेअर मास्क कसा तयार करायचा, याबद्दल काही टिप्स सांगणार आहोत. ज्या नक्की वापरून पाहा.(फोटो सौजन्य- istock)






