Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलती जीवनशैली ठरतेय धोकादायक; मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबामुळे वाढतोय रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका

Bad Lifestyle Causing Diseases : मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि वाढत्या ताणतणावामुळे व्हॅस्क्युलर डिसीजसह रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजारांमुळे हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि डोळे यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 15, 2026 | 08:10 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • बदलती जीवनशैली ठरतेय धोकादायक
  • वाढतोय रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका
  • योग्य जीवनशैलीचा करा अवलंब
मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॅालमुळे असंसर्गजन्य आजारांचे (Non-Communicable Diseases – NCD) प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता ताणतणाव यामुळे अनेक व्यक्तींना गंभीर रक्तवाहिनीसंबंधी आजारांचा सामना करावा लागत आहे.

Blood Donation: रक्तदान करण्यासाठी तुम्ही फिट आहात का? जाणून घ्या आरोग्याचे महत्त्वाचे नियम

रक्तवाहिन्यांचे आजार हे आज सार्वजनिक आरोग्यासमोरील एक मोठे आव्हान ठरत आहेत. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक हे या आजारांचे सर्वाधिक परिणाम असले तरी रक्तवाहिन्यांचे विकार शरीरातील इतर अनेक अवयवांनाही प्रभावित करू शकतात. अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयचे डॉ. संतोष पाटील, व्हॅस्क्युलर सर्जन यांनी पाय, मूत्रपिंड, मेंदू, डोळे आणि इतर महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्तपुरवठा बाधित झाल्यास गंभीर कोणत्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, याची माहिती दिली आहे, जाणून घ्या

व्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे धमन्या आणि शिरांसह रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या आजारांचा समूह होय. या आजारांमुळे शरीरातील विविध भागांपर्यंत होणारा रक्तप्रवाह कमी होतो किंवा या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. हे आजार प्रामुख्याने जीवनशैलीशी संबंधित आजारांशी जोडलेले आहेत.

गेल्या काही वर्षांत रक्तवाहिन्यांसबंधी आजाराने(व्हॅस्क्युलर डिसीज) पिडीत रुग्णसंख्येत जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामागे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॅालचे वाढते प्रमाण हे प्रमुख कारण ठरत आहे. दरमहा रक्तवाहिन्यांसबंधी आजाराचे निदान झालेल्या 40 ते 55 वयोगटातील सुमारे दहा पैकी तीन रुग्णांना यापैकी एक किंवा अधिक असंसर्गजन्य आजार असल्याचे आढळते.

जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद होतात किंवा त्यांचे नुकसान होते, तेव्हा महत्त्वाच्या अवयवांना होणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, पेरिफेरल आर्टरी डिसीज, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड आणि दृष्टीशी संबंधित गुंतागुंतीचा धोका वाढतो. चालताना पायात वेदना होणे, सूज येणे, मुंग्या येणे, थकवा जाणवणे, जखम भरुन न येणे, चक्कर येणे किंवा दृष्टीत अचानक बदल होणे ही या आजाराची सामान्य लक्षणे आहेत. दुर्दैवाने, अनेकांना ही लक्षणे गंभीर आजाराची पूर्वसूचना आहेत याची जाणीव नसते. परिणामी हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे, दृष्टी गमावणे, न भरणाऱ्या जखमा किंवा अगदी पाय गमावण्याची वेळ आणणारा पेरिफेरल आर्टरी डिसीज यांसारख्या गंभीर गुंतागुंती निर्माण झाल्यानंतरच अनेक रुग्ण डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घेतात.

बदलती जीवनशैली,तासनतास एकाच जागी बसून राहणे, धूम्रपान, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन आणि व्यायामाचा अभाव हे व्हॅस्क्युलर डिसीजसाठी प्रमुख जोखीम घटक आहेत. विशेषतः मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये याचा धोका अधिक असतो, कारण हे आजार कालांतराने रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात.

योग्य जीवनशैलीचा अवलंब करुन रक्तवाहिन्यांसंबंधी आजार टाळता किंवा नियंत्रित करता येऊ शकतात. नियमित व्यायाम, वजन नियंत्रित राखणे, रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, धूम्रपान टाळणे आणि फळे, भाज्या व तृणधान्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे यामुळे या आजारांचा धोका कमी करता येऊ शकतो. याशिवाय नियमित आरोग्य तपासण्या आणि वेळोवेळी तपासणी करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः ज्या कुटुंबात हृदयविकार किंवा रक्तवाहिन्यांच्या आजारांचा वैद्यकिय इतिहास आहे, त्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, निरोगी आहार, नियमित शारीरिक हालचाल, धूम्रपानासारखे व्यसन टाळणे, जीवनशैली आणि नियमित वैद्यकीय तपासण्या यांच्या मदतीने रक्तवाहिन्यांच्या आजारांचे प्रमाण कमी करता येते आणि दीर्घकालीन आरोग्य सुधारता येते.

Hair Care Tips: कोंड्यापासून त्रस्त आहात? घरच्या घरी तयार करा अँटी-डँड्रफ शॅम्पू; केस होतील निरोगी

Web Title: Vascular disease ncd increase diabetes hypertension cholesterol risk lifestyle diseases india symptoms prevention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • blood pressure
  • Diabetics
  • Healhy Lifestyle

संबंधित बातम्या

साखर तर फक्त निमित्त! ‘या’  वाईट सवयींमुळे होतो मधुमेह; अनेकांना ठाऊकच नाही
1

साखर तर फक्त निमित्त! ‘या’ वाईट सवयींमुळे होतो मधुमेह; अनेकांना ठाऊकच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.