
त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून 'या' पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
वर्षाच्या बाराही महिने त्वचेची व्यवस्थित काळजी घेतल्यास चेहरा कायमच उजळदार आणि सुंदर राहतो. पण कामाच्या धावपळीमध्ये त्वचेची व्यवस्थित काळजी घ्याल मिळत नाही. त्वचा खूप जास्त टॅन आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेच्या समस्या वाढू लागतात आणि चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स, ऍक्ने, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स येऊन त्वचेचा ग्लो कमी होऊन जातो. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे त्वचा खूप जास्त चिकट आणि तेलकट होते. तेलकट झालेली त्वचा वेळीच स्वच्छ न केल्यामुळे पिंपल्स आणि फोड येतात. त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे त्वचेच्या समस्या वाढतात. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि पिंपल्स घालवण्यासाठी कायमच महागड्या स्किन केअरचा वापर केला जातो. पण त्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला गुळाचा फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
फेसपॅक बनवण्यासाठी वाटीमध्ये गुळाची पावडर, टोमॅटो, लिंबाचा रस, चिमूटभर लिंबाचा रस घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात गुलाब पाणी टाकून पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेवर जमा झालेली धूळ, माती स्वच्छ होण्यासोबतच डेड स्किन निघून जाईल. त्यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेवर नको असलेले काळे डाग नष्ट होण्यास मदत होईल.
वाटीमध्ये गुळाची पावडर, द्राक्षाचा रस, चहा पावडर, हळद आणि गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावून घ्या. त्यानंतर १५ मिनिटं ठेवून त्वचा पाण्याने स्वच्छ करा. यामुळे त्वचेच्या वाढत्या समस्या कमी होण्यास मदत होईल आणि चेहरा उजळदार दिसेल. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा गुळाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळेल.
उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
गुळामध्ये विटामिन ए, बी, ग्लुकोज, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक असतात. याशिवाय गुळामध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. त्यामुळे गुळाचा वापर त्वचेसाठी करावा. गूळ शरीरासाठी खूप जास्त प्रभावी ठरते. यामुळे केवळ शरीर निरोगी राहत नाहीतर त्वचेवरील चमक वाढण्यास मदत होते. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी गुळाचा वापर करावा.
Ans: गुळामध्ये काही खनिजे आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात. मात्र गुळाचा फेसपॅक त्वचेवर ग्लो आणतो किंवा काळे डाग पूर्णपणे नाहीसे करतो, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.
Ans: गुळाचा फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा. तयार केलेला पॅक त्वचेवर हलक्या हाताने लावून काही मिनिटे ठेवावा आणि त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
Ans: नाही. कोणताही घरगुती फेसपॅक रोज वापरण्यापेक्षा मर्यादित प्रमाणात वापरणे योग्य आहे. त्वचेवर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर त्वरित थांबवावा.