Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

थायलंडमधील एका प्रसिद्ध मंदिराचा सोशल मीडियावर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेला व्हिडिओ समोर आला आहे. येथे धार्मिक दर्शनासोबतच पारंपरिक पोशाखातील फोटोशूटसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे सांगितले जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 24, 2026 | 08:10 AM
Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक...

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक...

Follow Us
Follow Us:
  • थायलंडमधील अनोखे मंदिर.
  • श्रद्धेसाठी नाही तर फोटोशूटसाठी भेट देतात लोक.
  • जाणून घेऊया सविस्तर माहिती.
आपण आजवर अनेक मंदिरांविषयी ऐकले असेल. आपल्या धार्मिक श्रद्धेसाठी आणि तेथील इतिहासासाठी मंदिर लोकप्रिय ठरतात. पण तुम्हाला माहितीये का? थायलंडमध्ये एक असे अनोखे मंदिर आहे जे तेथील देवी-देवता किंवा श्रद्धेसाठी ओळखले जात नाही तर फक्त फोटोशूटसाठी याचा वापर करण्यात येतो. मंदिरात खरंतर अनेक ठिकाणी फोटो, व्हिडिओ काढायला मनाई असते पण या मंदिरात फक्त फोटोशूट करायलाच लोक भेट देतात. चला तर मग या मंदिराविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

काय मंदिराचे नाव?

थायलंडच्या या अनोख्या मंदिराचे नाव आहे वॉट अरुण. इथे फिरायला येणारे लोक पारंपारिक कपडे परिधान करुन येथे फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करतात. आजच्या सोशल मिडियाच्या जगात सुंदर ठिकाणी पारंपारिक फोटोशूट करण्यासाठी हे ठिकाण थायलंडमध्ये लोकप्रिय आहे. जर तुम्ही कधी थायलंडला जाण्याचा विचार केला तर या ठिकाणाला भेट द्यायला विसरु नका.

पूजा नाही तर फॅशन शो

व्हिडिओ शेअर करणाऱ्या कंटेट क्रिएटरने सांगितले की, इतर मंदिरांपेक्षा या मंदिराचा अनुभव फार वेगळा आहे. तिने व्हिडिओत दाखवले की, इथे लोक दर्शनासाठी नाही तर पारंपारिक थाई पोशाख आणि दागिन्यांमध्ये सजून फक्त फोटोज क्लिक करायला येतात. क्रिएटरने व्हिडिओत म्हटले की, “भाऊ! काय जागा आहे ही! एक असं मंदिर जिथे लोक पूजा करत नाहीत, तर फॅशन शो भरवतात.” क्रएटरने स्वत:ही थायलंडचा पारंपारिक पोशाख आणि दागिने परिधान केले आणि पोझ देत अनोख्या मंदिराचा अनुभव घेतला.

रेंटल ड्रेस आणि दागिने

व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला फोटोशूट करण्यासाठी मंदिराच्या बाहेरच भाड्यावर कपडे आणि दागिणे मिळतात. ते खरेदी करुन तुम्ही तुमचा छानसा लूक तयार करु शकता आणि मंदिराच्या सुंदर आवारात आपले फोटोशूट पूर्ण करु शकता. मंदिराच्या आत फोटोशूट करण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले जात नाही, म्हणजेच कपडे आणि दागिण्यांसाठी पैसे द्यायचे असले तरी फोटोशूट तुम्ही फ्रिमध्ये करु शकता.

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

दरम्यान व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने आपला अनुभव शेअर करत सांगितले की, या ठिकाणी फोटोशूट अजिबात मोफत नाही. त्याने क्रिएटरला लोकांची दिशाभूल करु नका, असेही सांगितले. यूजरच्या दाव्यानुसार, ३० मिनिटांसाठी ६०० बाहत आणि एका तासासाठी १००० बाहत असा दर मंदिरात आकारला जातो. रुपयांमधील रक्कम काढण्यासाठी याला ३ ने गुणावे लागेल. कपड्यांसाठी महिलांना २५० बाहत आणि पुरुषांना २०० बाहत शुल्क आकारले जाते.

 

Web Title: Wat arun thailand temple photoshoot traditional dress rental viral video tourist attraction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • thailand
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
1

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
2

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही
3

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
4

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.