फोटो सौजन्य: pinterest
तुमच्याही घरी जर माठ असेल तर हा प्रयोग नक्की करुन पाहा. या ट्रीक्स छोट्या असल्या तरी याचा परिणाम मोठा आहे.
1. माठ ओलसर ठेवा
माठाच्या बाहेरील भागावर वेळोवेळी पाणी शिंपडा. मातीमधून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे (evaporation) पाणी अधिक थंड राहते. ही ट्रीक फार जुनी आहे. पुर्वीच्या गावातली माणसं कडाक्याच्या उन्हात पाणी थंड रहावं म्हणून माठाचा ओलसर कपडा गुंडाळून ठेवायचे.
2. थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवा
माठ नेहमी सूर्यप्रकाशापासून दूर आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. खिडकीजवळ किंवा सावलीत ठेवलेला माठ अधिक वेळ थंड राहतो. त्यामुळे पाणी गार जास्तवेळ राहतं.
3. माठ स्टँडवर ठेवा
माठ थेट जमिनीवर ठेवण्याऐवजी लाकडी किंवा प्लास्टिकच्या स्टँडवर ठेवा. यामुळे हवा खेळती राहते आणि थंडावा टिकतो. काहीवेळा जमिन किंवा लादी जास्त तापते म्हणूनच माठ कोणत्या ना कोणत्या स्टँडवर ठेवा.
4. नियमित स्वच्छता करा
माठ स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. आठवड्यातून एकदा तरी माठ धुवून वाळवावा. त्यामुळे पाणी ताजे आणि शुद्ध राहते. आरोग्यासाठी पाणी थंड असण्याबरोबरच ते शुद्ध असणं देखील महत्वाचं आहे.
5. नवीन माठ वापरण्यापूर्वी भिजवा
नवीन माठ घेतल्यावर तो काही तास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे मातीची छिद्रे सक्रिय होतात आणि थंडावा वाढतो.माठातील पाणी केवळ थंडच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर असते. त्यामुळे या साध्या आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करून तुम्ही फ्रिजशिवायही दिवसभर गार पाण्याचा आनंद घेऊ शकता. अशा छोट्या छोट्या सोप्या पण परिणामकारक ट्रीक्समुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या पाणी गार मिळेल.






