वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा
Weight Loss Recipe: वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी आहारात बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सप्लिमेंट्स, गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. वारंवार सप्लिमेंट्स आणि गोळ्या खाल्ल्यामुळे वाढत्या वयात शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करताना योग्य डाएट फॉलो करणे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळले जाते. चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरात थकवा, अशक्तपणा वाढतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून खमंग जाळीदार ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला ढोकळा चवीला अतिशय सुंदर लागतो.(फोटो सौजन्य – pinterest)






