Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रमाण कोकणी भाषा नक्की कोणती? महाराष्ट्रीय कोकणी बोलींचा दक्षिण कोकणीशी संबंध काय? जाणून घ्या

कोकणी ही एक प्राचीन, समृद्ध आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली भाषा आहे. जरी तिची प्रमाण भाषा पूर्णतः सर्वत्र स्वीकारली गेली नसली तरी ती विविध बोली-प्रकारांमध्ये आजही जगत आहे आणि जपली जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 26, 2025 | 03:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कोकणी ही भारतातील एक प्राचीन आणि समृद्ध भाषा असून तिचा उगम इंडो-आर्यन भाषाकुळात मानला जातो. ही भाषा मुख्यतः गोवा, महाराष्ट्र (कोकण किनारपट्टी), कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये बोलली जाते. कोकणी ही संविधानाच्या आठव्या अनुसूचीत समाविष्ट भाषांपैकी एक आहे आणि गोव्याची राजभाषा म्हणूनही मान्यता प्राप्त आहे. कोकणी भाषेचा उगम संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश या भाषांपासून झाला आहे. काही भाषाशास्त्रज्ञ कोकणीला मराठीची उपभाषा मानतात, तर काहीजण तिला स्वतंत्र भाषा मानतात. मात्र, भाषाशास्त्रीय अभ्यासातून हे स्पष्ट होते की कोकणी ही स्वतंत्र भाषा असून तिचा विकास प्राचीन कोकण प्रांतात झाला.

रात्रीच्या वेळी शांत झोप लागत नाही? झोपण्याआधी दुधात मिक्स करा ‘हा’ प्रभावी पदार्थ, रात्रभर लागेल शांत झोप

कोकणी भाषेचा एक मोठा प्रश्न म्हणजे तिच्या प्रमाण स्वरूपाचा अभाव. कोकणी ही विविध राज्यांमध्ये, वेगवेगळ्या लिपींमध्ये आणि उच्चारभेदांसह बोलली जाते. उदाहरणार्थ, गोव्यात देवनागरी लिपीत कोकणी लिहिली जाते, तर कर्नाटकात कन्नड लिपी, केरळमध्ये मल्याळम लिपी आणि काही ठिकाणी रोमन लिपी वापरली जाते. या लिपीभेदांमुळे आणि प्रादेशिक प्रभावांमुळे एकसंध प्रमाण भाषा तयार होण्यात अडचणी आल्या आहेत. तथापि, 1987 मध्ये गोव्यात कोकणीला राजभाषा म्हणून मान्यता दिल्यानंतर देवनागरी लिपीतली गोमांतकी बोली ही प्रमाण कोकणी म्हणून स्वीकारण्यात आली. पण अजूनही सर्व क्षेत्रात ती सार्वत्रिकपणे स्वीकारली गेली नाही.

कोकणीचे प्रकार व उपभाषा:

कोकणी भाषेच्या प्रमुख उपभाषांमध्ये काही प्रकार समाविष्ट आहेत. त्यातील एक म्हणजे गोमंतकी कोकणी! ही बोली गोव्यातील प्रमुख भाषा असून राज्याची राजभाषा आहे. सारस्वत समाजात सारस्वत कोकणी बोलली जाते. कर्नाटक राज्यच्या दक्षिण भागात मंगळुरी कोकणी बोलली जाते. उत्तर कर्नाटक तसेच गोव्याच्या सीमेला लागून असलेला कर्नाटक राज्यातील जिल्हा कारवार येथे कारवारी कोकणी बोलली जाते, जी बोली गोमंतकी नंतर मराठीशी सगळ्यात जवळची असणारी दक्षिण कोकणी बोली आहे. केरळात मालाबार भागात राहणारे काही समाजांमध्ये केरळी कोकणी बोलली जाते.

‘हापूस’ला आंब्यांचा राजा का मानला जातो? अशा प्रकारे करा अस्सल कोकणी हापूसची ओळख

महाराष्ट्रीय कोकणी मराठीची एकार्थी उपभाषा मानली जाते. राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर बोलल्या जाणाऱ्या कोळी, आगरी, कुपरी, East Indian Catholic बोली, कोकणा, वाडवळ बोली, बाणकोटी, चित्पावन बोली, संगमेश्वरी तसेच मालवणी आणि कुडाळी या सर्व बोलीभाषा महाराष्ट्रीय कोकणीचा भाग आहेत. या सर्व बोली मराठीशी जवळीक साधतात तसेच मराठी भाषेचा फार मोठा प्रभाव या कोकणी बोलींवर आढळून येतो. महाराष्ट्राच्या ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये या बोली आजही मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात.

Web Title: What exactly is the standard konkani language

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • Goa
  • kokan

संबंधित बातम्या

Former CM Ravi Naik Passes away:  गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन
1

Former CM Ravi Naik Passes away: गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.