
कोकणी पारंपरिक चवीची खापरोळी खाताच मन होईल तृप्त! 'या' पदार्थांचा वापर करून बनवा चविष्ट पदार्थ
कोकणी पद्धतीमध्ये बनवलेले पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. ओल्या खोबऱ्याचा किस, तांदूळ आणि इतर अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेले चविष्ट पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहेत. कोकणचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर समुद्र किनारा, हिरवागार निसर्ग आणि जिभेवर रेंगाळणारी अस्सल पारंपरिक कोकणी चवीचे पदार्थ. कोकणातील सर्वच पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. बऱ्याचदा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर नेमकं काय बनवावं सुचत नाही, अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये अस्सल पारंपरिक चवीची खापरोळी बनवू शकता. खापरोळी हा गोड पदार्थ आहे. हा पदार्थ नारळाच्या दुधासोबत खाल्ला जातो. कोकणातील प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी खापरोळी बनवली जाते. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारे पदार्थ बनवायला सगळ्यांचं खूप जास्त आवडत. कोकणात खापरोळी अतिशय आवडीने खाल्ली जाते. चला तर जाणून घेऊया अस्सल पारंपरिक कोकणी चवीची खापरोळी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
थंडीत भाज्यांना नाकारून कसं चालेल, राजस्थानी स्टाईलची ‘बेसन पालक भाजी’ खाल तर बोटंच चाटत रहाल