Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी
अॅनालॉग पनीर हे पारंपरिक पनीरचा पर्याय म्हणून तयार केलेले नॉन-डेअरी उत्पादन आहे. हे उत्पादन तयार करताना दुधाऐवजी वनस्पतीजन्य फॅट, स्टार्च आणि इतर प्रक्रिया केलेले घटक वापरले जातात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. मात्र, ग्राहकांना योग्य माहिती न देता ते सामान्य पनीर म्हणून विकले गेल्यास दिशाभूल होऊ शकते.
अॅनालॉग पनीर बनवण्यासाठी वनस्पती तेल किंवा चरबी, स्टार्च, सोया किंवा इतर वनस्पतीजन्य फॅट आणि चव आणि पोत टिकवून ठेवणारे पदार्थ वापरले जातात. हे सर्व एकत्र मिसळल्याने एक बनावट पनीर तयार होतो.
तज्ज्ञांच्या मते, काही अॅनालॉग पनीर उत्पादनांमध्ये हायड्रोजनेटेड फॅट, ट्रान्स फॅट किंवा चरबीचे प्रमाण जास्त असू शकते. अशा घटकांचे वारंवार सेवन केल्यास हृदयविकार, वाढलेले कोलेस्टेरॉल आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी उत्पादनावरील घटकांची माहिती तपासणे आवश्यक आहे.
खऱ्या पनीरला सहसा दुधाळ सुगंध आणि मऊ पोत असतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Fatty Liver: शरीर देतंय ‘हे’ संकेत? फॅटी लिव्हरची सुरुवात तर नाही ना; अजिबात दुर्लक्षित करू नका






