Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Broken Heart Syndrome चा पुरुषांना अधिक धोका, काय आहेत लक्षणं वेळीच घ्या जाणून

हार्ट ब्रेक मृत्यूला कारणीभूत ठरू शकते का? एका अभ्यासातही असेच काहीसे म्हटले आहे. भावनिक वा शारीरिक ताणामुळे होणाऱ्या ब्रेक हार्ट सिंड्रोममुळे पुरुषांचा मृत्यू होण्याची शक्यता महिलांपेक्षा दुप्पट असते

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 19, 2025 | 04:39 PM
ब्रोकन हार्ट सिंड्रोम नक्की काय आहे (फोटो सौजन्य - iStock)

ब्रोकन हार्ट सिंड्रोम नक्की काय आहे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला माहीत आहे का की ‘मन तुटलं’ हे केवळ शब्द नाहीत तर ती प्रत्यक्षात एक वैद्यकीय स्थिती आहे. याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम किंवा टाकोसुबो कार्डिओमायोपॅथी म्हणतात. यासंबंधी अलिकडेच झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पुरुषांमध्ये ब्रोकन हार्ट सिंड्रोममुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण महिलांपेक्षा दुप्पट आहे.

२०१६ ते २०२० पर्यंत अमेरिकेत या सिंड्रोमचे निदान झालेल्या २ लाख रुग्णांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की या सिंड्रोममुळे होणाऱ्या मृत्युदरात पुरुषांमध्ये ११.२% वाढ झाली आहे, तर त्या तुलनेत महिलांमध्ये हा दर फक्त ५.५% आहे. चला जाणून घेऊया की हे सिंड्रोम काय आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत हे Cleveland Clinic ने दिलेल्या अहवालातून आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे काय?

पुरुषांवर कसा होतो परिणाम

ब्रोकन हार्ट सिंड्रोम ही एक अल्पकालीन स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाचे स्नायू वेगाने कमकुवत होतात. हे सहसा काही भावनिक किंवा शारीरिक ताणानंतर घडते. या स्थितीत, हृदयाचे काही भाग योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत आणि काही भागांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. या स्थितीमुळे, हृदयाची रक्तपुरवठा आणि पंपिंग क्षमता कमी होते. यामुळे, पेशींना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचवणे कठीण होते आणि संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ लागतो.

जाणून घ्या का होतो ब्रेक अप? ब्रेक अपच्या या 6 कारणांपासून राहा सावध, अन्यथा ‘व्हॅलेटाईन डे’साठी घेतलेली महागडी गिफ्ट जातील वाया..

ब्रोकन हार्ट सिंड्रोमची लक्षणे काय आहेत?

कोणती लक्षणे ओळखावी

भावनिक किंवा शारीरिक ताणानंतर काही मिनिटांपासून ते काही तासांतच ब्रोकन हार्ट सिंड्रोमची लक्षणे दिसू शकतात. ताणतणावामुळे शरीरात काही हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे हृदयाच्या स्नायू काही काळासाठी कमकुवत होतात. यामुळे, ब्रोकन हार्ट सिंड्रोमची काही लक्षणे हृदयविकाराच्या झटक्यासारखीदेखील वाटू शकतात. त्याची लक्षणे नक्की काय आहे जाणून घ्या

  • छातीत अचानक तीव्र वेदना होणे
  • हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलचे कमकुवत होणे
  • अनियमित हृदयाचे ठोके
  • श्वास लागणे
  • रक्तदाब कमी होणे
  • हृदय धडधडणे
  • क्षीण होणे

कसे करावे व्यवस्थापन

कशी घ्यावी काळजी

ब्रोकन हार्ट सिंड्रोमवर उपचार करण्याचा कोणताही मार्ग नाही, परंतु काही ताण व्यवस्थापन पद्धती शारीरिक आणि भावनिक ताण कमी करू शकतात. ताण व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही या पद्धतींची मदत घेऊ शकता

  • दररोज थोडा वेळ व्यायाम करा
  • खोल श्वास घेण्याचे व्यायाम करा
  • सजगतेचा सराव करा आणि ध्यान करा
  • तुम्ही सपोर्ट ग्रुपमध्ये सामील होऊ शकता, जेणेकरून तुम्ही वेगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त रहाल 

Relationship Tips: 4 संकेत ओरडून सांगतात, तुम्ही निवडलाय चुकीचा जोडीदार; वेळीच व्हा सतर्क नाहीतर नातं होईल डोईजड

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: What is broken heart syndrome risky for men after break up what are the symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 04:39 PM

Topics:  

  • heart care tips
  • Love Relationship tips
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक, घरगुती उपाय ठरतील प्रभावी
1

छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक, घरगुती उपाय ठरतील प्रभावी

Toxic लोकांना कसे काढाल आयुष्यातून बाहेर, Jaya Kishori ने दिल्या कमालीच्या टिप्स; रहाल भावनिकरित्या स्वतंत्र
2

Toxic लोकांना कसे काढाल आयुष्यातून बाहेर, Jaya Kishori ने दिल्या कमालीच्या टिप्स; रहाल भावनिकरित्या स्वतंत्र

मुलांच्या स्मार्टनेसवर मुली फिदा? हुशारी, नेतृत्व आणि नाते यात भले मोठे संबंध
3

मुलांच्या स्मार्टनेसवर मुली फिदा? हुशारी, नेतृत्व आणि नाते यात भले मोठे संबंध

गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास आहात? हे घ्या ‘गर्लफ्रेंड डे स्पेशल Tips’
4

गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास आहात? हे घ्या ‘गर्लफ्रेंड डे स्पेशल Tips’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.