
फोटो सौजन्य सोशल मिडिया
मधुमेहामुळे हृदयाला होणारी इजा अनेकदा लक्षात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. हेडगेवार रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. महेश देशपांडे यांनी छातीत दुखण्याची लक्षणे व निदान, तर इंरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. केदार रोपळेकर यांनी तरुणांमधील वाढता हृदयविकार यावर मार्गदर्शन केले. घाटी रुग्णालयाच्या जेरियाट्रिक्स विभागाच्या प्रा. डॉ. मंगला बोरकर यांनी वृद्धांनी औषधांचे वेळापत्रक आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे सांगितले. ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सतीश रोपळेकर यांनी हार्टअटॅक, अँजिओप्लास्टी व बायपासनंतरच्या पुनर्वसनावर माहिती दिली. क्लिनिकल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कांचन रोपळेकर यांनी बदलत्या
वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ व कमलनयन बजाज रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. अजय रोटे यांनी मधुमेह, स्थूलता आणि हृदयविकाराचा संबंध स्पष्ट करत नियमित चालणे, व्यायाम, पथ्य आणि धूम्रपान टाळण्याचे आवाहन केले. डॉ. अजय रोटे म्हणाले की, नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, तणावावर नियंत्रण ठेवा आणि व्यसनांपासून दूर राहा -हृदय निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीत या चार गोष्टींचा अंगीकार करणे आवश्यक आहे.
सध्या तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याने छातीत दुखणे अथवा अस्वस्थता जाणवल्यास दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी व उपचार घेणे गरजेचे आहे.
निवृत्त आर्मी कॅप्टन डॉ. प्रदीप इनामदार यांनी प्रतिसाद देणाऱ्या रोबोटच्या साहाय्याने सीपीआरचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील नागरिकांची उपस्थिती होती.
LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral