फुप्फुसात म्यूकस वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा
प्रदूषणापासून फुप्फुसांचे संरक्षण करणारा श्लेष्म (म्युकस) जास्त प्रमाणात साचल्यास उलट धोका वाढतो आणि दमा व अॅलर्जीचे झटके तीव्र होऊ शकतात, असें महत्त्वाचे संशोधन आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी काढला आहे. मुंबईतील सततच्या प्रदूषण पार्श्वभूमीवर या अभ्यासामुळे श्वसनमार्गातील आजारांची कारणमीमांसा स्पष्ट होत असून भविष्यातील औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना नवी दिशा मिळण्याची मोठी शक्यता व्यक्त होत आहे.दरम्यान, आपल्या फुप्फुसांतील श्वसनमार्गामध्ये नैसर्गिक संरक्षण यंत्रणा म्हणून श्लेष्म (म्युकस) सतत स्त्रवत असतो. बाहेरील सूक्ष्म कण, धूळ, काजळी किंवा अॅलर्जेन आत शिरताच हा श्लेष्म त्यांना पकडून ठेवतो.(फोटो सौजन्य – istock)
कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा
मात्र आयआयटी मुंबईच्या नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, प्रदूषणाच्या सततच्या संपर्कामुळे श्वसनमार्गांमध्ये श्लेष्माचे प्रमाण वाढले तर संरक्षण मजबूत होण्याऐवजी ते कमकुवत ठरते. संशोधकांच्या अभ्यासात असे आढळून आले की अतिरिक्त श्लेष्म श्वसनमार्गांमध्ये सलग आवरण तयार करत नाही, तर ठिकठिकाणी अरुंद उंचवटे आणि गुठळ्या निर्माण होतात. परिणामी काही भाग पूर्णपणे उघडे राहतात. या उघड्या भागांवर अतिसूक्ष्म प्रदूषणकण साचण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे दमा, अॅलर्जी व इतर श्वसनविकारांचा धोका अधिक होतो. हा अभ्यास आयआयटी मुंबईचे संशोधक स्वर्णादित्य हाजरा आणि प्रा. जेसन आर. पिकार्डो यांनी केला आहे.
संशोधन प्रामुख्याने ‘मध्य श्वसनमार्गा’वर केंद्रित आहे. हे मार्ग श्वासनलिका आणि फुप्फुसांतील शेवटच्या वायुकोशांदरम्यान असतात. या भागात श्लेष्माचे आवरण भौतिकशाखीयदृष्ट्या ‘रेली-प्लॅटो अस्थैर्य या सिद्धांतानुसार वर्तन करते. त्यामुळे श्लेष्म एकसंध न राहता ठिकठिकाणी गोळा होतो आणि संरक्षणात खंड पडतो.
दमा आणि अॅलर्जीच्या झटक्यांचे भौतिकशास्त्रीय कारण समजण्यास मदत
प्रदूषित शहरांतील नागरिकांसाठी आरोग्यधोका अधिक स्पष्ट
श्वसनाद्वारे दिल्या जाणाऱ्या औषधांचे अचूक डिझाइन करण्यासाठी मार्गदर्शन
डिझायनर औषधकाण’ विकसित करून औषध थेट आवश्यक ठिकाणी पोहोचवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
साधारणपणे श्लेष्म जास्त असेल तर संरक्षण जास्त मिळेल असे वाटते. मात्र आमच्या अभ्यासातून असे दिसले की श्लेष्माचे प्रमाण वाढताच त्याचे आवरण तुकड्या-तुकड्यांत विभागले जाते. त्यामुळे श्वसनमार्गाचे काही भाग उघडे पडतात आणि अतिसूक्ष्म प्रदूषणकण सहजपणे आत शिरू शकतात. हा खरा ‘म्युकस पॅराडॉक्स’ आहे. प्रा. जेसन आर, चिकार्डी, केमिकल इंजिनियरिंग विभाग, आयआयटी मुंबई, यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. संशोधकांच्या मते, फुप्फुसांच्या संपूर्ण प्रणालीचे सर्वकष मॉडेल तयार करणे हे पुढील उद्दिष्ट असून, या अभ्यासामुळे श्वसनमार्गातील आजारांवरील उपचार अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले गेले आहे.






