
सुंदर दिसण्यासाठी काय खावं? सकाळपासून रात्रीपर्यंत हा डाएट चार्ट फॉलो करा; नॅचरली चेहरा राहील चमकदार
सकाळी काय खावे?
त्वचेला हायड्रेशनची सर्वात जास्त गरज असते. अशात पाण्याचे सेवन तुमच्या त्वचेसाठी चांगले ठरू शकते. सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट पाण्याचे सेवन करा. दिवसभर किमान दोन लिटर पाणी प्यायला हवे. यांनतर नाश्त्यात फळांचा समावेश करा. तुम्ही नाश्त्यात अंकुरलेले मूग, चणे किंवा बदाम हे पदार्थ खाऊ शकता. यातील पोषक घटक दिवसभर शरीरात ऊर्जा प्रदान करतात ज्यामुळे कामात मन लागून राहते. ड्रिंकविषयी बोलायचे झाले तर तुम्ही लिंबू-मधाच्या पाण्याचे सेवन करू शकता, नारळ पाणी, काकडीचा रस, स्ट्रॉबेरीचा रस, संत्र्याचा रस हे देखील उत्तम पर्याय ठरतील.
मिड मॉर्निंग
फक्त आहारच नाही तर व्यायामही शरीरात चांगले बदल घडवून आणतो. यामुळे आपले शरीर निरोगी राहते. तुमच्या सोयीनुसार रोज थोडा वेळ बाजूला काढून नियमित व्यायाम करा. नाश्त्यानंतर, ताजी फळे, सॅलड आणि घरी बनवलेले संपूर्ण धान्य असलेले जेवण खा. चपाती, डाळ आणि हिरव्या भाज्या यांचा आपल्या आहारात समावेश करा. तुम्ही जितक्या रंगीबेरंगी भाज्या खाल तितक्याच त्या तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. रंगीबेरंगी भाज्यांमध्ये अँथोसायनिन असतात, जे त्वचेखाली कोलेजन उत्पादनात योगदान देतात. फळांमध्ये, भरपूर लिंबूवर्गीय फळे खा. लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. लिंबूवर्गीय फळांमध्ये संत्री, किवी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, रासबेरी आणि ब्लूबेरी यांसारख्या आंबट-गोड फळांचा समावेश होतो. ही फळे विविध रोगांच्या धोक्यापासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते आणि त्वचेला तारुण्य मिळवून देते.
दुपारचा आहार
तुमचा दुपारचा आहार महत्वाचा असतो, ज्यामुळे पोटभर खा. परंतु यात तेलकट पदार्थांचा समावेश करू नका. प्रोसेस फूड, तेलकट पदार्थ, अतिगोड पदार्थ यांमुळे त्वचा खराब होऊ लागते. अशा पदार्थांचे सेवन त्वचेला तेलकट बनवते ज्यामुळे पिंपल्स होण्याची शक्यता असते. दुपारच्या जेवणात तुम्ही तांदूळ, एक मसूर डाळ, सॅलड, दही आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करू शकता. लक्षात ठेवा की त्वचा तरुण ठेवण्यासाठी भरपूर प्रथिने आवश्यक असतात. जर तुम्ही मांसाहारी असाल तर चिकन, अंडी, मासे इत्यादी खा.
संध्याकाळचा नाश्ता
संध्याकाळी लागणाऱ्या हलक्या भुकेसाठी आहारात फक्त हलक्या पदार्थांचाच समावेश करा. यासाठी तुम्ही ग्रीन टी, हर्बल टी, भाजलेले मखाना, भाजलेले सुके फळे, शेंगदाणे, कुकीज, ओट बिस्किटे किंवा स्मूदी यांचे सेवन करू शकता.
रात्रीचे जेवण
दिवसभर भरपूर खाल्ल्याने रात्रीचे जेवण हे नेहमी लाईट असावे. यात गरजेच्या आणि हेल्दी पदार्थांचे प्रमाण अधिक असुद्या. आपल्या जेवणाच्या ताटात तुम्ही भाजी, चपाती, भाकरी, सॅलड, सूप अशा पदार्थांचा समावेश करू शकता. चिकन आणि माशांचे सेवन देखील शरीरासाठी फायद्याचे ठरते.
झोपण्यापूर्वी
झोपण्यापूर्वी एक ग्लास हळदीचे दूध पिल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यामुळे रात्री शांत झोप लागते. झोप पूर्ण झाली की डोळ्यांखाली काळे डाग येत नाही आणि त्वचा सुधारण्यास मदत होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.