मकरसंक्रांतीच्या दिवशी काय खावे, जेवणात करा 'या' भाज्यांचा समावेश
नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वच महिला काळ्या रंगाची सुंदर साडी नेसून छान तयार होतात. शिवाय या दिवशी तीळगूळ वाटण्याची परंपरा आहे. तसेच प्रत्येक घरात महिला सुगड पूजन करतात. मकर संक्रांत हा सण राज्यातील प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. घरोघरी महिला सुगड पूजन करतात. सुगड पूजन करताना त्यात थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व भाज्यांचा वापर केला जातो. घरात समृद्धी आणि सुख-शांती लाभण्यासाठी सुगडाची पूजा केली जाते. त्यामध्ये शेतातील नवीन धान्य, तिळ, ऊस, गहू, आणि विविध डाळी फुलांसह भाज्यांचा सुद्धा समावेश केला जातो. हिवाळा ऋतूच्या शेवटी शेतकऱ्यांच्या कष्टाच्या फळाचा आदर आणि सन्मान व्हावं म्हणून मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
गुळाचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये गुळाचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. हिवाळ्यात वातावरणात गारवा असतो. त्यामुळे शरीरातील उष्णता आणि ऊर्जा कमी होऊन जाते. शरीरातील कमी झालेली ऊर्जा आणि उष्णता वाढवण्यासाठी आहारात गुळाचे सेवन करावे. गूळ खाल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. तसेच रात्री झोपण्यापूर्वी गूळ खाल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील आणि भूक वाढेल.
मकर संक्रांतीच्या दिवशी तीळगूळ वाटण्याची परंपरा आहे. तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला, अशा शुभेच्छा देत मकर संक्रांत साजरी केली जाते. हिवाळ्यामध्ये तीळाचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर मानले जाते. पांढऱ्या तीळांचे सेवन केल्यामुळे शरीरातील अशक्तपणा, थकवा, आळस कमी होऊन आराम मिळतो. हिवाळ्यामध्ये कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी पांढऱ्या तीळांचे सेवन करावे.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर गाजर उपलब्ध असतात. गाजर खाल्यामुळे शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. गाजरपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करताना मडक्यामध्ये गाजर टाकले जाते. गाजर खाल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
थंडीमध्ये बाजारात हरभरे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. हरभरे तव्यावर भाजून खाल्यास चव अतिशय सुंदर लागते. थंडीत कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी हरभाऱ्यांचे सेवन केले जाते. ज्यामुळे शरीर आतून उबदार राहते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये उपलब्ध असलेले हिरवे हरभरे खावेत.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
मकर संक्रांतीच्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या मिठाईच्या पदार्थांमध्ये खजुराचा वापर केला जातो. खजूर आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. खजूर खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते शिवाय शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.