अक्रोड खाण्याचे गुणकारी फायदे
डिजिटल युगात सगळ्याच गोष्टी मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल मीडियावर मिळू लागल्या आहेत. कोरोना नंतरच्या काळात सगळ्याच गोष्टी ऑनलाईन होऊ लागल्यामुळे तासनतास मोबाईल बघणे, लॅपटॉपवर काम करणे, सतत टीव्ही पाहत राहणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जात आहे. या सगळ्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागतो. जास्त मोबाईलची किंवा लॅपटॉपची स्किन पाहत राहिल्यामुळे चष्मा लागण्याची शक्यता असते. एकदा चष्मा लागला की तो कायम डोळ्यांवर लावून फिरावं लागतो. त्यामुळे चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य त्या सवयी फॉलो करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: अशा पोजिशनमध्ये अजिबात झोपू नका, मृत्यूला देत आहात आमंत्रण
डोळ्यांवर लागलेला चष्मा घालवण्यासाठी तुम्ही अक्रोड हे फळ खाऊ शकता. आरोग्यासाठी अक्रोड अतिशय गुणकारी आहे. सकाळी उठल्यानंतर नियमित भिजवलेले एक किंवा दोन अक्रोड खाल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स, अँटीऑक्सिडंट्स, विटामिन ई आढळून येते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. रोजच्या आहारात विटामिन ई चे सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होईल. अक्रोड खाल्यामुळे डोळ्यांवरील चष्मा निघून जाण्यास मदत होईल.
अक्रोड हे ड्रायफ्रूट असून यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. अक्रोड खाल्यामुळे डोळ्यांचे रक्तभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. यामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक आढळून येतात. तसेच यामुळे रेटिनाची क्षमता वाढण्यास मदत होते.
अक्रोड खाण्याचे गुणकारी फायदे:
अक्रोडमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्यासोबत शरीराला सुद्धा फायदा होतो. डोळ्यांचे हानिकारक पेशींपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी अक्रोडाचे सेवन करावे. सतत मोबाईल किंवा लॅपटॉप पाहत राहिल्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होऊन जाते आणि रेटिनाला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या सर्व पदार्थांचे सेवन करावे. अक्रोडातील अँटीऑक्सिडंट्सडोळ्यांचे नुकसान होण्यापासून बचाव करतात. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी तल्लख राहते.
हे देखील वाचा: हिवाळ्यात तळपायांना भेगा पडल्यात? मग ‘हे’ घरगुती तेल वापरून मिळावा आराम, टाचा होईल मुलायम
डोळ्यांची जळजळ कमी होते:
डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी नियमित अक्रोडचे सेवन करावे. रात्री झोपण्याआधी दोन अक्रोड पाण्यात भिजत घालून ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर साल काढून अक्रोडाचे सेवन करा. यामुळे दृष्टी चांगली राहील. यामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांची जळजळ होण्यापासून बचाव करतात. अक्रोड खाल्यामुळे डोळ्यांचा तणाव कामी होतो.