झोप ही आपल्या रोजच्या दिनक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुरेशी आणि चांगली झोप झाली की दिवसभर मड फ्रेश राहतो आणि काम करण्यासाठी शरीरात एनर्जी बनून राहते. मात्र झोपवतानाही काही गोष्टीं ध्यानात ठेवणे फार गरजेचे ठरते. चुकीच्या स्थितीत झोपणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पोटावर झोपणे, अर्धे बसणे, अर्धे झोपणे, डोके वरच्या बाजूला टेकवून झोपणे अशा स्थितीत झोपणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे हाडे आणि स्नायूंना इजा होऊ शकते.
गरोदरपणात चुकीच्या पद्धतीने झोपल्याने गर्भावर विपरीत परिणाम होतो. आपल्या शरीराला किमान 7-8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. चुकीच्या पद्धतीने झोपल्याने हाडे, स्नायू किंवा मज्जातंतूंना इजा होऊ शकते. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जितकी जास्त लोक झोपतात तितकी जास्त झोप येते. चुकीच्या पद्धतीने झोपल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होऊ शकतात याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – फक्त 5 रुपयांत तयार करा हे आयुर्वेदिक पाणी, झटपट वितळेल चरबी, वेट-लॉससाठी फायदेशीर
मणक्यावर दबाव, शरीर दुखणे
तज्ज्ञांच्या मते, पोटावर झोपणे आरोग्यासाठी हानिकारक ठरत असते, असे केल्याने पाठीवर व मणक्यावर शरीराचा दाब पडतो. या स्थितीत झोपल्याने बहुतांश वजन शरीराच्या मध्यभागी येते. अशा परिस्थितीत, पाठीच्या कण्यातील स्थिती बदलत नाही आणि त्यावर दबाव निर्माण होतो. त्यामुळे शरीराच्या इतर भागातही वेदनांच्या तक्रारी दिसू लागतात. पोटावर झोपणे शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी घातक ठरत असते.
वेदना आणि येण्याची तक्रार
पोटावर झोपल्याने शरीरात निष्क्रियता जाणवते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना आणि मुंग्या येणे अशा समस्या दिसू लागतात. कधी कधी तर शरीर सुन्न झाल्यासारखे वाटते. जे लोक पोटावर झोपतात त्यांना अनेकदा मानदुखीचा त्रास होतो.
प्रेगनंट महिलांनी असे करणे टाळावे
जर एखादी महिला गर्भवती असेल तर तिने पोटावर झोपणे टाळावे. हा सल्ला अनेकदा डॉक्टरांकडूनही देण्यात येतो. अशा परिस्थितीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण गरोदरपणात स्त्री पोटावर झोपली तर त्याचा विपरीत परिणाम पोटातील बळावर होऊ शकतो.
हेदेखील वाचा – सावधान! हे पदार्थ पुन्हा गरम केल्यानंतर बनतात विष, आजपासूनच सेवन टाळा नाहीतर पडेल महागात
पोटावर झोपण्याचे फायदे
पोटावर झोपण्याचे जसे तोटे आहेत तसेच याचे काही फायदे देखील आहेत. जर एखाद्याला झोपताना घोरण्याची सवय असेल तर त्यामुळे अनेकांच्या समस्या वाढतात. अशा स्थितीत पोटावर झोपल्यास घोरण्यापासून आराम मिळतो.
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.