तळपायांना पडलेल्या भेगा बऱ्या करण्यासाठी घरगुती उपाय
राज्यभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे हळूहळू त्वचेसंबंधित आणि आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्या आहेत. थंडीची चाहूल लागली की तळपायांना भेगा पडू लागतात. या भेगा हळूहळू मोठ्या झाल्यानंतर त्यामध्ये घाण जमा होऊन पाय पूर्णपणे खराब दिसू लागतात. तसेच तळपायांना पडलेल्या भेगांमधून रक्तसुद्धा येऊ लागते.त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये शरीरासोबतच त्वचेच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. तळपायांना पडलेल्या भेगा थंडीच्या दिवसांमध्ये वाढू लागतात. शिवाय चालताना किंवा उभं राहिल्यानंतर वेदना होण्यास सुरुवात होते. त्यामुळे थंडीच्या सुरुवातीला झालेला त्रास पुन्हा होऊ नये म्हणून आधीच त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: विटामिन बी12 मुळे शरीराच्या नसा झाल्या आहेत निर्जीव? मग आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश
थंडीच्या दिवसांमध्ये हातापायाला पडलेल्या भेगा खूप वेदनादायी असतात. ज्यामुळे व्यवस्थित चालतासुद्धा येत नाही किंवा बाहेर गेल्यानंतर जास्त त्रास होऊ लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तळपायांना पडलेल्या भेगा बऱ्या करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तळपायांवरील भेगा बऱ्या होण्यास मदत होईल.
तळपायांना पडलेल्या भेगा बऱ्या करण्यासाठी तुरटीचा वापर करा. तुरटी त्वचेच्या समस्यांवर प्रभावी उपाय आहे. तुरटी लावल्यामुळे जखम बरी होण्यास मदत होते. तसेच तळपायांना पडलेल्या भेगा घालवण्यासाठी तुरटीचा वापर रात्री करा. ज्यामुळे पायांच्या भेगा भरण्यास मदत होईल. तुरटी लावण्याआधी पाय स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करून घ्या. पाय धुतल्यानंतर कोरडे करून झाल्यावर वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात व्हॅसलिन किंवा ऑलिव्ह ऑईल टाकून मिक्स करा. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा तुरटी पावडर टाकून मिक्स करा.
तयार केलेला तुरटीचा लेप पायांना व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर 10 मिनिटं पायांवर लेप तसाच ठेवून वरून पायमोजे घाला आणि रात्रभर पाय तसेच ठेवा. सकाळी उठल्यानंतर अंघोळीला गेल्यानंतर पाय गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय सतत 8 ते 10 दिवस नियमित केल्यास पायांवरील भेगा बऱ्या होतील आणि आराम मिळेल. भेगा पूर्ण बऱ्या होईपर्यंत पायांना तुरटीचा लेप लावल्यास पाय लवकर बरे होतील आणि आराम मिळेल.
हे देखील वाचा: पापण्यांवर मस्करा लावल्यानंतर जाड थर दिसतो? मग मस्कारा लावताना ‘या’ चुका करणे टाळा
तुरटी लावल्यानंतर त्वचेसंबंधित अनेक समस्या बऱ्या होण्यास मदत होते. तुरटीमध्ये असलेले गुणधर्म जखम, खाज, पुरळ बरी करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यानंतर तुरटीचा वापर करावा. तुरटी अनेक आजारांवर प्रभावी आहे. तुरटीमुळे त्वचेमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते आणि पाय चांगले दिसू लागतात.